चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या
चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

25347
जंगमहट्टी ः पाटणे ते जंगमहट्टी फाट्यापर्यंत अशी धोकादायक झाडे आहेत.

‘पाटणे-जंगमहट्टी मार्गावरील
धोकादायक झाडे काढवीत’
चंदगड ः पाटणे ते जंगमहट्टी मार्गावर जागोजागी अनेक धोकादायक झाडे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी ती झाडे काढावी अशी मागणी आहे. कर्नाटक आणि दोडामार्ग, गोव्याला जोडणाऱ्या या मार्गावर सतत वर्दळ असते. पर्यटकांबरोबरच अवजड वाहतूक करणारी वाहनेही मोठ्या संख्येने असतात. धोकादायक झाडांमुळे या मार्गावरील प्रवास अत्यंत भितीदायक झाला आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडे कोलमडली आहेत. अवजड वाहनांच्या टपाला त्याचे घर्षण होत आहे. ही झाडे तातडीने बाजूला काढणे गरजेचे आहे. त्याशिवाय आंबा, फणसाची जूनी झाडे वठल्यामुळे पावसाने ती कोलमडून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा झाडांचे सर्वेक्षण करुन ती तोडून रस्ता वाहतुकीला सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
-----------------
गांधी वसतीगृहात प्रवेशासाठी आवाहन
चंदगड ः खेडूत शिक्षण मंडळाच्या येथील महात्मा गांधी वसतीगृहामध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू आहे. पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या गरीब, हुशार, होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटोसह वसतीगृह कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष एल. डी. कांबळे व अधिक्षक आर. जी. साबळे यांनी केले आहे.
--------------------------
धुमडेवाडीत वशिया देवाची शुक्रवारी यात्रा
चंदगड ः धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील जागृत दैवत श्री वशिया देवाची यात्रा शुक्रवारी (ता. ३) साजरी होत आहे. पंचक्रोशीतील भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62998 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top