पत्रके संबंधित पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके संबंधित पत्रके
पत्रके संबंधित पत्रके

पत्रके संबंधित पत्रके

sakal_logo
By

सावरकरांच्या गीतांचा आज कार्यक्रम
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळातर्फे सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ‘नाद सुरमयी’तर्फे उद्या (ता. ३१) ‘सागरा प्राण तळमळला’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होत आहे. राजेंद्र मेस्त्री आणि सहकलाकार सादरीकरण करतील. माहेश्‍वरी गोखले, क्षितीजा ताशी निवेदन करतील. सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल, पद्माराजे हायस्कूलमध्ये कार्यक्रम होईल, अशी माहिती अध्यक्ष नितीन वाडीकर, कार्यवाह शालन शेटे, उपाध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली. प्रवेश विनामूल्य असेल.
...
25414
कोल्हापूर : रेसिडेन्सी कॉलनी मित्र मंडळातर्फे आंदोलन करताना कार्यकर्ते.

केएमटी वर्कशॉप मेन गेट रस्त्यावर
स्ट्रीट लाईट व्यवस्था व्हावीः निरंकारी
कोल्हापूर : केएमटी वर्कशॉप मेन गेट ते अॅस्टर आधार हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक वर्षापासून स्ट्रीट लाईटची व्यवस्था महापालिकेने केलेली नाही. हा रस्ता रात्री अंधाराचा असतो. या रस्त्यावरून अॅस्टर आधारच्या महिला कर्मचारी तसेच महिला, नागरिकांना रात्रीचा या रस्त्याने जाताना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. यासाठी केएमटी वर्कशॉप मेन गेट ते ॲस्टर आधारपर्यंत रस्त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था व्हावी, अशी मागणी रेसिडेन्सी कॉलनी मित्र मंडळातर्फे उमेश निरंकारी यांनी केली. यासाठी आंदोलन हे केले.
या रस्त्यावरून अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बाहेरच्या रुग्णाच्या नातेवाईकांनाही हा त्रास होत आहे. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविण्याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे संबंधित महिलांनी तक्रार केली होती. या तक्रारीचे निरसन होण्यासाठी (स्व) आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडे १२ ऑक्टोबर २०२० ला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन महापालिकेने रस्त्यावर पोल उभारले. हे पोल गेले सहा महिने आहे त्या स्थितीत आहेत. त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था आजअखेर महापालिकेने केलेली नाही. याबाबत महापालिकेच्या स्ट्रीट लाईट विभागाकडे तक्रार करूनही स्ट्रीट लाईट बसविल्या नाहीत. याच्या निषेधार्थ रेसिडेन्सी कॉलनी मित्र मंडळाने या पोलवर दिवट्या लावून निषेध केला.
आंदोलनात रमेश पाटील, महादेव सुतार, राज पाटील, ऋतुराज सुर्यवंशी, जश पाटील, ओंकार भोसले, हेमंत निरंकारी, विश्‍वजित पाटील, निखिल भोसले, अभिजित पिसाळ, शास्त्रीनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...
जयंती नाला स्वच्छता अभियान
कोल्हापूर : जयंती नाला पावसाळ्या अगोदर स्वच्छ करण्यासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशन, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीबरोबर महापालिकेच्या सहकार्याने सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत चार ठिकाणी नाला सफाई केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सिद्धिविनायक मंदिर, हुतात्मा पार्क, कोंडा ओळ, रेणुका मंदिर परिसर या ठिकाणी सर्व स्वयंसेवक, महापालिका कर्मचाऱ्यांनी नाला पात्रात उतरून सफाई केली. प्लास्टिक आणि कचरा गोळा केला. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे निलेश जंजिरे, स्वप्नील पवार आणि सहकारी, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे प्रा. बस्वराज पुजारी, प्रा. सुरजकुमार पाटील, डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे प्रा. राम पवार आणि विद्यार्थी-विद्यार्थीनिंनी स्वयंसेवक म्हणून काम केले. मोहिमेचे समन्वयक म्हणून फाउंडेशनचे कोल्हापूर प्रतिनिधी सार्थक कोळेकरने जबाबदारी पार पाडली. विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल देशमुख, श्रावणी काणेकर, इशा शिंदे, सिद्धांत माने यांनी नियोजन केले. प्राजक्ता भानुसे हिने सूत्रसंचालन केले. सिया शेटे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63076 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top