आजरा सूतगिरणीच्या कामगारांना वेजबोर्ड लागू : अशोक चराटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा सूतगिरणीच्या कामगारांना वेजबोर्ड लागू : अशोक चराटी
आजरा सूतगिरणीच्या कामगारांना वेजबोर्ड लागू : अशोक चराटी

आजरा सूतगिरणीच्या कामगारांना वेजबोर्ड लागू : अशोक चराटी

sakal_logo
By

आजरा सूतगिरणीच्या कामगारांना
वेजबोर्ड लागू : अशोक चराटी
आजरा, ता. ३० : अण्णा भाऊ आजरा सूत गिरणीच्या कामगार कर्मचारी यांना वेजबोर्ड लागू करणार असल्याची घोषणा अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केली. सूत गिरणीचा कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा. त्याचे राहणीमान उंचावावे, यासाठी प्रयत्न असून कामगार दिनाची भेट म्हणून सूतगिरणीचे कामगार व कर्मचाऱ्यांना वेजबोर्डच्या तरतुदी लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचेही चराटी यांनी स्पष्ट केले.
चराटी म्हणाले, ‘‘संस्थेचे संस्थापक (कै) काशिनाथ चराटी, (कै) माधवराव देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पावलावर पाय टाकून सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने सूतगिरणीची संस्था प्रगती साधत आहे. जनरल मॅनेजर अमोघ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन घालून वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या काळानंतर वस्त्रोद्योग व्यवसाय सुरळीत सुरू होता; पण या काही महिन्यात कापसाच्या दरात दीडपटीने वाढ झाली. पंचेचाळीस हजार रुपये खंडीने मिळणारा कापूस एक लाख पंधरा हजार रुपये खंडीपर्यंत पोहोचला आहे. त्या पटीत सुताचे दर वाढलेले नाहीत. यामध्ये कामगार व कर्मचारी यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सूतगिरणी सातत्याने सुरू ठेवण्याची धडपड सुरू आहे. कापसाअभावी उद्योग बंद ठेवावा लागत आहे, अशी परिस्थिती तयार झाली आहे. याही परिस्थितीमध्ये वाढत्या महागाईचा विचार करता आशेचा किरण म्हणून कर्मचारी व कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी वेजबोर्ड लागू करीत आहे.’’ उपाध्यक्ष डॉ. देशपांडे यांनी सूतगिरणीसाठी कामगार व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त हजर दिवस योगदान द्यावे, असे आवाहन केले. या वेळी अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, संचालक जयसिंग देसाई, अविनाश सोनटक्के, रजनीकांत नाईक, नारायण मुरुकटे, जी. एम. पाटील, राजू पोतनीस, डॉ. इंद्रजित देसाई, सुधीर कुंभार, संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मालूताई शेवाळे, मनीषा कुरुणकर, हसन शेख, जनरल मॅनेजर अमोघ वाघ, चीप अकाउंटंट विष्णू पोवार, अधिकारी सचिन सटाले, राजेंद्र धुमाळ, आर. ए. पाटील, श्रीकांत कुलकर्णी, कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63118 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top