शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली तात्काळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली तात्काळ
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली तात्काळ

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली तात्काळ

sakal_logo
By

शासकीय कर्मचाऱ्यांच्या
बदल्या झाल्याच पाहिजेत
राजपत्रित अधिकारी महासंघाचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली न करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे. बदली कायद्यानुसार या बदल्या ३१ मे २०२२ पर्यंत तत्काळ झाल्याच पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना ३१ मेपर्यंत बदल्या झाल्या पाहिजेत. सध्या शासनाने बदली न करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे. हा निर्णय तत्काळ मागे घेतला पाहिजे. वास्तविक बदल्या व त्याबाबतची कार्यवाही वेळेवर झाल्यास नवीन ठिकाणी शाळा, निवासस्थान व पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याचा नाहक त्रास कर्मचारी व शासकीय अधिकारी यांना होणार आहे. त्यामुळे शासनाने ३१ मेपर्यंत बदल्यांचे आदेश काढले पाहिजेत, अशीही मागणी केली. निवेदनावर अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांची सही आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63205 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top