धनगरी ढोल वादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनगरी ढोल वादन
धनगरी ढोल वादन

धनगरी ढोल वादन

sakal_logo
By

२५५१२

धनगरी ढोल वादनात
उचगावचे मंडळ प्रथम
गडहिंग्लजला स्पर्धा; उपळावी, गडमुडशिंगी मंडळांचेही यश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : येथील गडहिंग्लज तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आयोजित धनगरी ढोल वादन स्पर्धेत उचगावचे श्री मंगराया वालंग मंडळाने प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे पारितोषिक पटकावले. श्री लक्ष्मी वालंग मंडळ (उपळावी) व श्री धुळसिद्ध बिरदेव वालंग मंडळाने (गडमुडशिंगी) अनुक्रमे १५ हजार व ११ हजारांचे बक्षीस पटकावले. देवाप्पा बिरदेव वालंग मंडळ (अब्दुललाट) व श्री लक्ष्मी वालंग मंडळाने (डोणेवाडी) विभागून चौथा क्रमांक मिळविला. श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात स्पर्धा झाल्या. समाजाचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने अध्यक्षस्थानी होते.
पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. राजेंद्र तारळे, मुरारी चिकोडे, संतोष चिकोडे, रवींद्र पुजारी, हारुण सय्यद, बाळासाहेब रानगे, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, युवराज बरगे, लक्ष्मण पुजारी, तानाजी रानगे, विठ्ठल पुजारी, रमेश रिंगणे, रामाप्पा करिगार, मोतीराम बन्ने, शिवाजी भमानगोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सिद्धार्थ बन्ने यांनी प्रास्ताविक केले. ताटावरील नाणे जेवढे जास्त सरकेल, तो संघ विजयी घोषित केला. सायंकाळी सुरू झालेल्या स्पर्धा पहाटेपर्यंत सुरू होत्या. ढोलवादन पाहण्यासाठी परिसरातील शौकीनांची मोठी हजेरी होती.
क्रीडाशिक्षक सुरेश मगदूम, सचिन मगदूम, संपत सावंत, बाळू जाधव, विठ्ठल भमानगोळ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सोमनाथ कारदगे, अजित भमानगोळ यांनी संयोजन केले. सिद्धार्थ बन्ने, विठ्ठल भमानगोळ, डॉ. शशिकांत पुजारी, मंजुनाथ कुरणे, प्रकाश भमानगोळ, सुरेश भमानगोळ, सिदलिंग अर्जुनवाडे, संभाजी अर्जुनवाडे, सतीश अर्जुनवाडे, आनंदा कारदगे, ऋतुराज कारदगे आदींनी परिश्रम घेतले. डॉ. शशिकांत पुजारी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63268 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top