आरक्षण सोडतीला ना गर्दी, ना उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षण सोडतीला ना गर्दी, ना उत्साह
आरक्षण सोडतीला ना गर्दी, ना उत्साह

आरक्षण सोडतीला ना गर्दी, ना उत्साह

sakal_logo
By

महापालिका फोटो
25509
ना गर्दी, ना उत्साह
आरक्षण सोडतीला सभागृहात जेमतेम कार्यकर्ते; प्रभागांबद्दल संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची औपचारिकता आज झाली. सभागृहात राजकीय पक्षांचे जेमतेम कार्यकर्तेच उपस्थित होते. कार्यकर्त्यांत प्रभाग रचनेबद्दल संभ्रम होता. ओबीसी आरक्षण नसल्याने राजकीय कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली. कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यापेक्षा पोलिस बंदोबस्तच अधिक होता. आरक्षण सोडतीचा ना उत्साह दिसला, ना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
महापालिका आरक्षण सोडत राजकीय कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांच्यासाठी धामधुमीचा दिवस असतो. आरक्षण सोडतीच्या दोन दिवस आधीपासूनच अंदाज बांधायला सुरुवात होते. कागदावर गणिते मांडली जात होती. आपल्या प्रभागात अपेक्षित आरक्षण पडल्यावर कार्यकर्ते आणि इच्छुक फटाके उडवायचे. गुलालाची उधळण व्हायची. जय-पराजयाचे आडाखे बांधले जायचे. यंदा मात्र असे काहीच झाले नाही. पहिल्यांदाच महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने आणि ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. असे असले तरी राजकीय कार्यकर्त्यांत उत्साह दिसला नाही. पूर्वी सोडतीदिवशी केशवराव भोसले नाट्यगृह कार्यकर्त्यांनी भरून जायचे. सभागृहाबाहेरही कार्यकर्ते असायचे. यंदा मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. काही इच्छुक, त्यांचे समर्थक असे पन्नासभर लोकच सभागृहात होते. ओबीसी आरक्षण नसल्याने आरक्षण सोडतीची उत्कंठता नव्हती. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या आरक्षणाचे निकष आणि नियम ठरलेले असतात. कोणत्या प्रभागावर हे आरक्षण पडणार, याचा अंदाज इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना होता. त्यामुळे लोकांनी येण्याचे टाळले. आरक्षणाची सुरुवात अनुसूचित जाती महिला यापासून झाली. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, त्यानंतर सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर केले. आरक्षण सोडत झाल्यावर सर्व कार्यकर्ते बाहेर आले व ओबीसी आरक्षण झाल्याशिवाय निवडणुका नकोत, असे मत व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, शिनसेनेचे नेते किशोर घाटगे, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्यासह अन्य पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
-----------------------
ॅऑनलाईन प्रक्षेपण
काही वृत्तवाहिन्यांनी आरक्षण सोडत ऑनलाईन दाखवल्याने बहुतांशी जणांनी घरी बसून थेट प्रक्षेपण पाहण्यातच धन्यता मानली.
----------------
कडेकोट पोलिस बंदोबस्त
या वर्षी झालेल्या सोडतीला कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पार्किंगची व्यवस्था प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात होती. पोलिसांबरोबरच अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेर रुग्णवाहिकाही तैनात होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63332 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top