गडहिंग्लजमध्ये अहिल्याबाईंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजमध्ये अहिल्याबाईंना अभिवादन
गडहिंग्लजमध्ये अहिल्याबाईंना अभिवादन

गडहिंग्लजमध्ये अहिल्याबाईंना अभिवादन

sakal_logo
By

25631
गडहिंग्लज : धनगर समाजातर्फे पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी काढलेल्या मिरवणुकीत पिवळे फेटे बांधून सहभागी झालेले समाजबांधव. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

गडहिंग्लजमध्ये अहिल्याबाईंना अभिवादन
प्रतिमेची मिरवणूक; व्याख्यानातून उलगडला कार्याचा जीवनपट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : गडहिंग्लज तालुका धनगर समाजातर्फे आज पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्‍लोक होळकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध उपक्रमांतून अहिल्याबाईंना अभिवादन करण्यात आले. प्रा. शिवाजी भुकेले यांनी व्याख्यानातून अहिल्याबाईंच्या कार्याचा जीवनपट उलगडला.
सकाळी महालक्ष्मी मंदिरापासून प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरासह तालुक्यातील महिला-पुरुष समाजबांधव पिवळ्या रंगाचे फेटे बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सजवलेल्या वाहनामध्ये अहिल्याबाईंची प्रतिमा ठेवण्यात आली होती. धनगरी ढोल वादन आणि भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक नेहरु चौक, वीरशैव चौक, मेन रोड, दसरा चौकातून फिरुन अहिल्याबाई होळकर चौकात विसर्जित झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अमर मांगले यांच्या हस्ते नामफलक अनावरण झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात प्रा. शिवाजी भुकेले यांचे व्याख्यान झाले. समाजाचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी स्वागत केले. संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, तहसीलदार दिनेश पारगे, हारुण सय्यद, रामाप्पा करिगार, रामगोंड उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, माजी नगराध्यक्षा निरुपमा बन्ने, उदय पुजारी, राजेंद्र तारळे, संतोष चिकोडे, मुरारी चिकोडे, रमेश रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. मुश्रीफ यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. करिगार, तारळे, सलवादे, चिकोडे यांची भाषणे झाली. कृतिका पुजारी व प्रांजल पुजारी या चिमुकलींनीही अहिल्याबाईंच्या जीवनकार्यावर भाषणे केली. समाजाचे कार्याध्यक्ष विठ्ठल भम्मानगोळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष मंजुनाथ कुरणे, खजिनदार डॉ. शशिकांत पुजारी, सचिव सोमनाथ कारदगे, लक्ष्मण पुजारी, लगमान्ना भम्मानगोळ, नागाप्पा कारदगे, सिद्राम अर्जूनवाडे, सिद्धाप्पा भम्मानगोळ, मुरारी पुजारी, अभिषेक पुजारी, अजित भम्मानगोळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63392 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top