तंबाखू विरोधी रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखू विरोधी रॅली
तंबाखू विरोधी रॅली

तंबाखू विरोधी रॅली

sakal_logo
By

25684
कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे
तंबाखूविरोधी जनजागृती रॅली
कोल्हापूर, ता. ३१ ः जागतिक तंबाखू विरोधीदिनाचे औचित्य साधून आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे तंबाखूविरोधी रॅली काढली. तंबाखूच्या वाढत्या सेवनामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळते. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन जनजागृती रॅलीद्वारे डॉ. संदीप पाटील यांनी केले.
हुतात्मा पार्क येथून रॅलीची सुरवात झाली. शिवाजी उद्यमनगर, स्टेशन रोड, सीबीएसमार्गे ही रॅली राजारामपुरी जनता बजार चौकात आली आणि येथे सांगता झाली. यावेळी ‘तंबाखूला हद्दपार करूया, ‘मानवी जगणे सुखकर करूया’ अशा घोषणा दिल्या.
डॉ. पाटील म्हणाले, ‘परदेशात तंबाखूचा वापर किटकनाशक म्हणून केला जातो, मात्र आपल्या देशात तंबाखूचे सेवन केले जाते. यात किशोरवयीन मुलेही गुरफटत आहेत. अशा तंबाखूजन्य व्यसन लागल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वेळीच सावध होऊन व्यसनापासून दूर राहावे.’ डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, डॉ. किरण बागूल, डॉ. नीलेश घामणे, डॉ. गिरीश कोरे, शशिकांत पाटील, कुमार पाटील, उदय पाटील, इरफान बोरगावे, निवास भालेराव आदी उपस्थित होते.

तंबाखू व्यसनापासून दूर राहा
डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या, ‘‘पुरुषांप्रमाणे महिलाही तंबाखूचे सेवन करतात. अतिव्यसनी व्यक्तीत ७० टक्के रुग्णांचा मौखिक आजार वाढलेला दिसतो. मौखिक विकाराचे वेळीच निदान व उपचार केल्यास बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यासाठी दातांची हिरड्यांची चांगली स्वच्छता करणे, नियमित व्यायाम करणे,
तीव्र सूर्यकिरणापासून बचाव करणे, पालेभाज्या खाणे, कमी चरबीयुक्त पदार्थाचे सेवन करणे तसेच धूम्रपान तंबाखूचे व्यसन वर्ज करणे अशी खबरदारी घेऊन चांगले आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63443 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top