
थॅलिसेमिया संस्थेतर्फे कुलगुरुंना निवेदन
25671
कोल्हापूर : फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया संस्थेतर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन देताना सदस्य.
थॅलेसेमिया आजाराची माहिती
अभ्यासक्रमात समाविष्ट करा
फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया संस्थेचे कुलगुरूंना निवेदन
कोल्हापूर, ता. १ : थॅलेसेमिया आजाराची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करा, या मागणीचे निवेदन फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया संस्थेतर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, थॅलेसेमिया हा रक्तातील गंभीर अनुवंशिक आजार असून, या आजारातील रुग्णांच्या अंगात जन्मतःच रक्त तयार होत नाही. या मुलांना जगवण्यासाठी प्रत्येक १५ ते २१ दिवसांतून रक्ताची एक पिशवी चढवावीच लागते. फक्त जिल्ह्यात थॅलेसेमियाचे २५o तर महाराष्ट्रात १४ooo पेक्षा जास्त रुग्ण आहेत. थॅलेसेमिया रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी बोन मॕरो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी २५ ते ३o लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. जो सामान्य कुटुंबांना परवडणारा नाही. दोन थॅलेसेमिया मायनर व्यक्ती विवाह बंधनातून एकत्र आल्यास होणारे अपत्य थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त जन्मू शकते. ज्याला नियमित रक्तसंक्रमण, औषधे, तपासण्यावर अवलंबून रहावे लागते. इतके करूनही थॅलेसेमिया रुग्णाचे सरासरी आयुष्य ३o पेक्षा जास्त असत नाही. काही ठराविक समुदायांमध्ये जवळील नात्यांमध्ये विवाह लावले जातात. त्यातून अनुवंशिकतेने दोन थॅलेसेमिया मायनर एकत्र येण्याची शक्यता असते. विवाह करताना दोन थॅलेसेमिया मायनर एकत्र येऊ नयेत, यासाठी विवाहपूर्व तपासणी करणे गरजेचे आहे.
महाविद्यालयातील तरुण-तरुणींना थॅलेसेमियाची माहिती अभ्यासक्रमातूनच झाल्यास ते थॅलेसेमिया मायनरची विवाहपूर्व तपासणी करून घेतील. थॅलेसेमिया आजाराविषयी समाजात जनजागृती होण्यास मदत होईल.
संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव उमेश पाटील, उपसचिव डॉ. ऋषिकेश पोळ उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी लवकरच संबंधित विषयाच्या प्राध्यापक, डॉक्टरांशी चर्चा करून थॅलेसेमिया विषय विद्यार्थ्यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवायचा याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63475 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..