अ,ब,क प्रभाग म्हणजे काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अ,ब,क प्रभाग म्हणजे काय
अ,ब,क प्रभाग म्हणजे काय

अ,ब,क प्रभाग म्हणजे काय

sakal_logo
By

ईव्हीएम मशिन फोटो

प्रभागातील अ,ब,क रचना काय आहे?
त्रिसदस्यीय प्रभाग ; निवडणुकीत तीन स्वतंत्र ईव्हीएम मशिन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर,ता.३१ ः प्रभागातील अ, ब आणि क हे केवळ निवडणुकीपुरतेच आहेत. हे प्रभागातील उपप्रभाग नाहीत. आरक्षण टाकणे, उमेदवारी अर्ज भरणे व मतमोजणीनंतर विजयी उमेदवार ठरवण्यासाठी अ, ब आणि क ही रचना केली आहे. या निवडणुकीला प्रत्येक मतदाराला तीन मते द्यावी लागणार आहेत. त्यासाठी तीन स्वतंत्र ईव्हीएम मशिन असतील. निवडणुकीनंतर अ,ब, आणि क ही रचना असणार नाही. याबाबत नागरिकांत संभ्रम दिसून येत आहे. याचा घेतलेला आढावा.
--
*प्रश्न ः अ,ब आणि क हे प्रभागातील उपप्रभाग आहेत का? त्यांच्या सीमा कोणत्या आहेत?
*उत्तर - अ, ब आणि क हे प्रभाग किंवा उपप्रभाग नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याही सीमा नाहीत. निश्चित केलेल्या प्रभागातील कोणतीही व्यक्ती त्या त्या आरक्षणानुसार प्रभागात उभारू शकते. त्या प्रभागातील सर्व नागरिकांना निवडणुकीस उभारलेल्या कोणत्याही तीन मतदारांना मतदान करत येणार येईल.
निवडून आलेले तीन नगरसेवक प्रभागातील कोणत्याही गल्लीत, वस्तीत किंवा भागात निधी खर्च करू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही बंधन नाही.

*प्रश्न ः अ,ब आणि क ही रचना कशासाठी आहे? त्याचा उपयोग कसा होणार?
*उत्तर - ही रचना प्रभागातील आरक्षण टाकण्यासाठी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि निवडणुकीनंतर निकाल घोषित करण्यासाठी आहे. उदा. एकाच प्रभागात तीन आरक्षणे असतील तर प्रभाग क्र १६ मधील ‘अ’ मध्ये एका गटातून आरक्षण, ‘ब’ मध्ये दुसऱ्या गटाचे आरक्षण आणि ‘क’ मध्ये तिसरे आरक्षण असेल.
उमेदवारी अर्ज भरतानाही याच पद्धतीने भरले जाणार आहेत. उदा. प्रभाग क्रमांक १६ मधील ‘अ’ साठी अर्ज. अशा पद्धतीने अर्ज भरला जाईल. निवडणुकीचा निकाल लागतानाही प्रभाग क्रमांक १६ मधील अ गटातून विजयी उमेदवार अशा पद्धतीने लागेल. मात्र त्यानंतर या अ, ब आणि क रचनेचा कोणताही संबंध असणार नाही. एका प्रभागाचे प्रतिनिधित्व निवडणून येणारे तीनही नगरसेवक करतील.

*प्रश्न ः मतदान प्रक्रिया कशी असेल
*उत्तर - प्रत्येक मतदाराने तीन मते द्यायची आहेत. त्यासाठी मतदान कक्षात अ,ब आणि क गटाची प्रत्येकी तीन स्वतंत्र ईव्हीएस मशिन असतील. त्यावर त्या त्या गटातील उमेदवारांना मतदान करायचे आहे. प्रत्येक गटातून एक या पद्धतीने ३ उमेदवारांना मतांच्या संख्येवर विजयी घोषीत केले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63483 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top