फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

२५६५९

लोगो : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा

‘दिलबहार’चा उपांत्य फेरीत प्रवेश 
‘जुना बुधवार’वर टायब्रेकरमध्ये ३-१ ने विजय 

कोल्हापूर, ता. ३१ : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत दिलाबाहर तालीम मंडळ संघाने ‘टायब्रेकर’मध्ये संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३-१ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आक्रमक आणि सूत्रबद्ध चाली रचत जुना बुधवार संघाने विजयी इराद्याने मैदानावर खेळ केला. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट पासिंगवर प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. संघाच्या आक्रमकतेमुळे बुधवारचा संघ सामन्यात आघाडी घेणार असे वाटत असतानाच अभिषेक भोपळे याने चढाई करत ३६ व्या मिनिटाला गोल नोंदवत अपेक्षित आघाडी घेतली. यानंतर ‘दिलबहार’ने आपला खेळ सावरत व बचाव फळी मजबूत करत ‘जुना बुधवार’ची अनेक आक्रमणे रोखली. सामन्याचा पूर्वार्ध १ - ० असा राहिला.  उत्तरार्धात ‘दिलबहार’ अधिक आक्रमक चाली रचत राहिला. वारंवार आक्रमणे आणि लाँग पासच्या जोरावर ‘जुना बुधवार’ची बचाव फळी कमकुवत केली. यानंतर गोलसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. सामन्याच्या ७० व्या मिनिटाला सतेज साळोखे याने चढाई करत गोल नोंदवला. यामुळे सामना पूर्णवेळ गोल एक असा बरोबरीत राहिला. यानंतर झालेल्या ‘टायब्रेकर’मध्ये ‘दिलबहार’च्या सनी सणगर, मसूद मुल्ला व रोहन दाभोलकर यांनी गोल नोंदवले, तर सचिन पाटील व सतेज साळोखे यांचे प्रयत्न वाया गेले. ‘जुना बुधवार’च्या रौनक कामबाले हा एकमेव खेळाडू गोल नोंदवण्यात यशस्वी ठरला. हरीश पाटील, सुशील सावंत ओंकार चौगले यांचे फटाके वाया गेले. अखेर सामना ३ - १ असा होऊन ‘दिलबहार’ने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आजचे सामने 
संध्याकाळी ४ वा. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63493 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top