टेनिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेनिस
टेनिस

टेनिस

sakal_logo
By

२५६६३
टेनिस 

तमिळनाडूच्या राजेश्वरनकडून
नियती कुकरेतीचा पराभव

कोल्हापूर, ता . ३१ : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत १४ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात तमिळनाडूच्या बिगरमानांकित माया राजेश्वरनने उत्तराखंडच्या अव्वल मानांकित  नियती कुकरेतीचा टायब्रेकरमध्ये ७-६(६), ६-३ असा पराभव करत धक्का दिला. तिच्या या झुंजार खेळीने सर्वांची मने जिंकली. 
   कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात तेलंगणाच्या श्रीमान्या अनुगोंडा ने पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या नैनिका बेन्द्रमचा ६-१, ६-२ असा तर, तेलंगणाच्या रिशीता बासिरेड्डी ने गुजरातच्या सातव्या मानांकित सायली ठक्करचा ६-२, ६-० असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हरयानाच्या सुहानी गौर ने उत्तर प्रदेशच्या आठव्या मानांकित शगुन कुमारीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव करून आगेकूच केली. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या वेदांत भसीन याने पाचव्या मानांकित हरयानाच्या ध्रुव सचदेवाचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव करून आगेकूच केली. उत्तर प्रदेशच्या प्रियांश बर्थवालने बाराव्या मानांकित स्मित पटेलला ७-६(२),४-६, ७-६(५) असे पराभूत केले. 

निकाल: दुसरी फेरी 
मुले: 
क्रिश त्यागी(कर्नाटक),वेंकट बटलांकी(तेलंगणा), वंश नांदल(हरयाना),वेदांत भसीन(महाराष्ट्र),अर्जुन राठी(हरयाना),तेजस आहुजा(हरयाना),अर्जुन पंडित,मयंक शर्मा,प्रियांश बर्थवाल(उत्तर प्रदेश),रेथीन प्रणव आर.एस (तमिळनाडू).

मुली:
माया राजेश्वरन (तमिळनाडू), अमोदीनी नाईक (कर्नाटक), अस्मि आडकर(महा), श्रीमान्या अनुगोंडा(तेलंगणा), आरुषी रावळ (गुजरात),
आकृती सोनकुसरे (महा), रिशिता बासिरेड्डी (तेलंगणा), सुहानी गौर (हरयाना), मनोग्य मदसू (आंध्र प्रदेश).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63499 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top