ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक नको ः सर्व पक्षीय भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक नको ः सर्व पक्षीय भावना
ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक नको ः सर्व पक्षीय भावना

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक नको ः सर्व पक्षीय भावना

sakal_logo
By

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको

सर्वपक्षीय नेत्यांची भावना; राजकीय कार्यकर्त्यांना आरक्षणाचा आला अंदाज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः ओबीसी आरक्षण नसल्याने आरक्षण सोडत प्रक्रियेत उत्साह नव्हता. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्या प्रभागावर, कोणते आरक्षण पडणार? याचे ठोकताळे ठरलेले आहेत. त्यानुसार आरक्षणाचा अंदाज राजकीय कार्यकर्त्यांना आल्याने प्रत्यक्ष सोडतीच्या ठिकाणी गर्दी नव्हती. आरक्षणाच्या या तिढ्याबद्दल राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटते? याचा वेध घेणाऱ्या प्रतिक्रिया.
--------------------

‘ओबीसी‘ आरक्षण असते तर कोणते प्रभाग सर्वसाधारण असणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा असती. पण आता सर्वसाधारणपणे किती व कोणते प्रभाग सर्वसाधारण राहणार, कोठे, कोणते आरक्षण पडणार याची कल्पना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे. पर्यायाने आज सोडतीच्या ठिकाणी गर्दी झाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी आरक्षण असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
- अजित ठाणेकर, माजी नगरसेवक, भाजप.

शहरात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज पूर्वीपासून आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणामुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यांचे आरक्षण पुन्हा कायम राहावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. ओबीसी आरक्षण देऊन निवडणुका होणे हेच सर्वांना अपेक्षित आहे.
- आर. के. पोवार, माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. महापालिकेची निवडणूक ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरच झाली पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी एकत्रित प्रयत्व करण्याची गरज आहे.
- किशोर घाटगे,शिवसेना नेते.

ओबीसी समाजाला सत्तेत वाटा मिळावा, त्यांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. त्यामुळे जो पर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महापालिका निवडणूक घेऊ नयेत. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे.
- तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक, काँग्रेस
-----------------------
चौकट
आरक्षणावर ओबीसीची
टांगती तलवार कायम
राज्य सरकार जून, जुलै दरम्यान एम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षण कायम ठेवले तर महापालिका आरक्षण सोडत पुन्हा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आज झालेल्या आरक्षण सोडतीवर ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार कायम आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63519 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top