
सावरकर संगीत मैफल
२५६५२
‘ने मजसी ने परत मातृभूमीला...!’
सावरकर जयंतीनिमित्त ‘सागरा प्राण तळमळला’ मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः ‘शूर आम्ही सरदार..’, ‘है प्रीत जहाँ की रीत...’, ‘मेरे देश की धरती...’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ अशा देशभक्तीपर गीतांनी आज सारा माहौल राष्ट्रप्रेमाने भारावून गेला. निमित्त होते, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळातर्फे आयोजित ‘सागरा प्राण तळमळला’ या मैफलीचे. येथील राम गणेश गडकरी सभागृहात रंगलेल्या या मैफलीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतांसह विविध देशभक्तीपर गीतांचा सुरेख मेळ साधत ही मैफल रंगली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ही मैफल झाली. मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी, संजीव कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, साईप्रसाद बेकनाळकर, अपर्णा फडके, विकास परांजपे, सुभाष पुरोहित आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवरायांच्या आरतीने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तीपर गीते सादर झाली. नाद सूरमयी संस्थेचे सादरीकरण होते. प्रसिद्ध गायक राजेंद्र मेस्त्री, रणजित बुगले, वैदेही जाधव यांचा स्वरसाज होता. स्वानंद जाधव, प्रशांत देसाई, सोहम जाधव, शिवाजी सुतार यांची साथसंगत होती. क्षितिजा ताशी यांचे निवेदन होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63532 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..