अहिल्याबाई होळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर

sakal_logo
By

25708
शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी झाली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले. फगवाडा (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख तथा सामाजिक वंचितता व समावेशन केंद्राचे संचालक डॉ. जगन कराडे, डॉ. एम. टी. गोफणे, डॉ. किशोर खिलारे आदी उपस्थित होते.
..........
25709
मुक्त विद्यापीठातर्फे अभिवादन
कोल्हापूर ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या येथील विभागीय कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी झाली. विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. अहिल्याबाई यांचा जन्म ‘चौंडी बीड’ येथे माणकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्याच्या पोटी झाला. अहिल्याबाईंनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राज्याचा डोलारा सांभाळला आणि त्यांच्या काळात विविध समाजोपयोगी कामे त्यांनी केली, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
..........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63536 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top