
जागृतीमध्ये निवृत्तीनिमित्त सत्कार
25718
गडहिंग्लज : जागृती प्रशालेत सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारप्रसंगी डॉ. सतीश घाळी, अरविंद कित्तूरकर, विजयकुमार चौगुले, माला आजरी व सत्कारमूर्ती.
जागृतीमध्ये निवृत्तीनिमित्त सत्कार
गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी स्वागत केले. माजी मुख्याध्यापक एम. आर. पाटील, पर्यवेक्षक ए. आर. गवस, सहायक शिक्षक एस. ए. कतगार, प्रयोगशाळा सहायक एम. बी. मगदूम, प्रयोगशाळा परिचर के. डी. भोसले, परिचर बी. डी. कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी सुहास पुजारी यांची भाषणे झाली. सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बी. जी. भोसकी, श्रीरंग तांबे, अनिता चौगुले, व्ही. एस. शिंदे, एम. बी. गुलगुंजी, माला आजरी, एस. एम. बागेवाडी, ए. एच. आंबी, एच. आर. नदाफ, सी. एस. मठपती, ए. बी. जाधव, एस. एस. पाटील उपस्थित होते. संपत सावंत, आय. एस. मरडी यांनी सूत्रसंचालन केले. आर. बी. पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63570 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..