चंदगडला स्मृतीस्तंभाची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला स्मृतीस्तंभाची स्वच्छता
चंदगडला स्मृतीस्तंभाची स्वच्छता

चंदगडला स्मृतीस्तंभाची स्वच्छता

sakal_logo
By

25827
चंदगड ः स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस्तंभाची स्वच्छता करताना विद्यार्थी.

चंदगडला स्मृतिस्तंभाची स्वच्छता
चंदगड : येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या आवारात उभारलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाची स्वच्छता केली. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रा. सुहास कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यलढा आणि त्यामध्ये योगदान दिलेल्या सर्वसामान्य स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांची स्मृती चिरंतन ठेवणे हे नव्या पिढीचे काम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्मृतिस्तंभ पाण्याने धुवून स्वच्छ केला तसेच परिसराचीही स्वच्छता केली. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. प्रा. टी. एम. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63720 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top