
आसगाव- हेरे मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था
25829
आसगाव ः हेरे मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
आसगाव- हेरे मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था
चंदगडः आसगाव ते हेरे मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. सध्या जागोजागी खडी उचकटली आहे. रस्त्यावर डांबराचा मागमूसही दिसत नाही. तीन किलो मीटरचे अंतर कापताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या गावाला जोडणारे कोनेवाडी मार्गे, हंबीरे मार्गे आणि हेरे मार्गाला जोडणारा असे तीन रस्ते आहेत. चंदगडला जाणाऱ्या नागरीकांना हंबीरे मार्ग जवळचा पडतो तर हलकर्णी, बेळगावकडे जाणाऱ्या नागरीकांना कोनेवाडी मार्गे अंतर कमी पडते. त्यामुळे नागरीक याच दोन मार्गांचा सर्वाधिक वापर करतात. कोकणात आणि तिलारी, हेरे परिसरात जाणाऱ्या नागरीकांना मात्र हेरे रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचाच वापर करावा लागतो. शिवाय ताम्रपर्णी नदीला महापूर आल्यानंतर चंदगड आणि कोनेवाडी दोन्ही मार्ग बंद होतात. त्यावेळी गावाला जोडणारा हेरे रस्त्याला जोडणारा एकमेव मार्ग असतो. मात्र सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63721 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..