तीस पोलिस कर्मचारी निवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीस पोलिस कर्मचारी निवृत्त
तीस पोलिस कर्मचारी निवृत्त

तीस पोलिस कर्मचारी निवृत्त

sakal_logo
By

२५८८५

जिल्हा दलातून तीस पोलिस निवृत्त
११ सहायक फौजदारांना बढतीचे ‘गिफ्ट’; अधीक्षक बलकवडे यांच्या हस्ते सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः जिल्हा पोलिस दलातील ३० कर्मचारी सेवानिवृत्त झाले. कर्तव्याच्या अखेरच्या दिवशी ११ सहायक फौजदारांना फौजदार पदाचे ‘गिफ्ट’ देऊन गौरविण्यात आले. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलिस दलातील तीन उपनिरीक्षक, ११ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक, ११ सहायक फौजदार, तीन हवालदार आणि दोन पोलिस नाईक असे ३० कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. यामधील ११ सहायक फौजदार यांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षक पदावर मान्यता देण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक मनोहर कोळी, महादेव कोळी, संजय खारगे, सतीश मोरे, रमेश हजारे, राजन कांबळे, मनोहर खारगावकर, राजू थोरात, तानाजी कुदळे, बळवंत चौगुले आणि महादेव पाटील यांचा समावेश होता. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बाजवली होती. त्यांचा अलंकार हॉल येथे परिवारासमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे, पोलिस निरीक्षक अंबऋषी फडतरे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास पोलिस कर्मचारी सुनील जांभळे यांनी विशेष सहकार्य केले.

९१ जणांना श्रेणी पोलिस
उपनिरीक्षकाची मान्यता

जिल्हा पोलिस दल आस्थापनेवरील ८० सहायक फौजदार विहित निकष पूर्ण करीत असल्याने त्यांनादेखील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मान्यता दिली. एकूण ९१ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक यांना मान्यता देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63759 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top