
राज्यसभा निवडणुकीत बडा नेता पराभूत होईल
फोटो घेणे
राज्यसभा निवडणुकीत
बडा नेता पराभूत होणार
आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाकीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येणार, हे नक्की आहे. मात्र या निवडणुकीत मोठा नेता पराभूत होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘टाहो मोर्चा’नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘राज्यसभा निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्यासाठी घोडेबाजार होणार नाही. मात्र राज्यातील एक बडा नेता पराभूत होईल. आमचे नियोजन पक्के आहे. वाटल्यास महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. महाविकास आघाडीचे सर्व नेते भाजपवरच टीका करतात. कारण त्यांना झोपेतसुद्धा भाजपच दिसतो. हे तिन्ही पक्ष एकमेकांशी खूप भांडतील; मात्र ते सरकार पडू देणार नाहीत. कारण त्यांना हे पक्क माहिती आहे की सरकार पडल्यावर पुन्हा भाजपच सत्तेत येणार आहे. ज्या वेळी आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्या वेळी सगळा हिशेब चुकता करू.’’
‘१४ हजार कोटी
जमिनी घेण्यासाठी नाहीत’
जीएसटीचे १४ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते की १४ हजार कोटींची रक्कम ही पॅट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासाठी नाही. या पैशांतून ते कर कमी करणार नाहीत. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार नाहीत. मग है पैसे ते जमिनी खरेदीसाठी वापरणार का?’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63787 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..