महापुराचा आढावा राज्य निवडणूक आयोगाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुराचा आढावा राज्य निवडणूक आयोगाला
महापुराचा आढावा राज्य निवडणूक आयोगाला

महापुराचा आढावा राज्य निवडणूक आयोगाला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ - जिल्ह्यात गेल्या पाचवर्षात कोण कोणत्या ठिकाणी आपत्ती आली याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांकडून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाईल. त्यानंतर ती सात जूनला आयोगाला पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात महापूर आला होता. त्यामध्ये काही ठिकाणी भूस्‍खलन झाले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले.
प्रापंचिक साहित्य, शेती, जणावरे यांचेही मोठे नुकसान झाले. नेमकी कोणत्या ठिकाणी आपत्ती आली त्यामुळे सार्वजनिक जीवनावर किती आणि कसा परिणाम झाला याचीही माहिती संकलीत केली जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्यामुळे, भूस्खलन झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद होते. तसेच महापुराचे पाणी आल्यामुळेही पुणे-बंगळूर महामार्ग ही बंद झाला होता. जिल्हा आणि राज्य मार्ग ही बंद झाले होते. महापुराचे पाणी किती दिवस शहरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते. शेती आणि जनावरांचे झालेले नुकसान याचीही माहिती संकलीत केली जात आहे. राज्यभरात अशी माहिती सर्वच जिल्हा पातळीवरून मागविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातूनही संबंधित तहसिलदारांकडून अशी माहिती संकलीत केली जात आहे. सात जूनला हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63801 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top