
चला, मानवी साखळीत सहभागी होवूया
चला, मानवी साखळीत
सहभागी होवूया...!
कोल्हापूरकर महापूर प्रश्नी उद्या एकवटणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शहर आणि जिल्ह्यातील महापुराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता.३) कोल्हापूरकर एकवटणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी ‘सकाळ''च्या पुढाकाराने मानवी साखळी होणार आहे. सकाळी नऊ वाजता एकाच वेळी सर्व ठिकाणी मानवी साखळी होणार असून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची खबरदारी स्थानिक संयोजकांनी घेतली आहे. सकाळी नऊ ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंतच ही साखळी होईल.
शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत महापुराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील महापुराची कारणे वेगळी आहेत. तशीच ज्या ज्या ठिकाणी महापुराचा विळखा पडतो तेथील कारणे वेगळी आहेत. एकूणच जिल्ह्याचा विचार केला तर अशा सर्व कारणांचा अभ्यास ‘सकाळ''च्या माध्यमातून सुरू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातही याबाबत विविध अंगांनी अभ्यास होणार असून अंतिम अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच पूरग्रस्त भागातील लोकांच्या सहभागातून त्याला अंतिम स्वरूप येणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून मानवी साखळी होत असून आपापल्या परिसरातील या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63867 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..