कोल्हापूर दक्षिण विधवा प्रथा बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर दक्षिण विधवा प्रथा बंदी
कोल्हापूर दक्षिण विधवा प्रथा बंदी

कोल्हापूर दक्षिण विधवा प्रथा बंदी

sakal_logo
By

विधवा प्रथा बंदी ठराव करणारा
‘कोल्हापुर दक्षिण’ राज्यातील पहिला मतदारसंघ
आमदार ऋतुराज पाटील ः सर्व पस्तीस ग्रामपंचायतींनी केले ठराव
कोल्हापूर, ता. १ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्व ३५ ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणारा कोल्हापुर दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे. सर्व ग्रामपंचायतींनी आवाहनाला प्रतिसाद देत राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या विचारांचा जागर करत स्त्री समानतेसाठी ठोस पाउल उचलले. सर्व ग्रामपंचायतीनी घेतलेला निर्णय हा अतिशय अभिमानास्पद व आदर्शवत असल्याचे आमदार ऋतूराज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगाव,गांधीनगर,सरनोबतवाडी, गडमूडशिंगी, वळीवडे, वसगडे,सांगवडे, चिंचवाड, सांगवडेवाडी,उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव, कणेरी, नेर्ली, हलसवडे, कणेरीवाडी, कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, पाचगाव, दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नंदगाव, गिरगाव, द. वडगाव-वड्डटवाडी, कोगील बुद्रुक, कोगील खुर्द, निगवे खालसा, वडकशिवाले, खेबवडे, चुये, नागांव व कावणे या ग्रामपंचायतिनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे. त्यासाठी करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांचेही योगदान मोलाचे राहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63874 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top