कुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती
कुस्ती

कुस्ती

sakal_logo
By

२५८९८
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत बुधवारी खासबाग मैदान येथे शाहू महाराज चषक स्पर्धेचे उद्‍घाटन करताना राहुल रेखावार. शेजारी विनोद चौगले, नामदेव मोळे, अशोक माने, संभाजी वरुटे, चंद्रकांत चव्हाण, बाबासाहेब देवकर, बाबा शिरगावकर, बाळू पाटील आदी ( बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा )
२५८९६
कोल्हापूर : महिला गटात मिसबा मुल्ला (इचलकरंजी) हिला चितपट करताना स्मिता पाटील (आमशी).
(बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
२५८८९
प्रवीण वडगावकर याने सारंग पाटील याला चितपट केले. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा )

भैरू, अंकिताची विजयी सलामी
खासबाग कुस्ती मैदानात दीर्घ प्रतीक्षेनंतर घुमला शड्डू
कोल्हापूर, ता. १ : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज राजर्षी छत्रपती शाहू खासबाग कुस्ती मैदानावर शड्डू घुमला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृति​​शताब्दी​ निमित्त आयोजित ''कृतज्ञता पर्व'' अंतर्गत राजर्षी ​छत्रपती ​शाहू ​महाराज चषक ​कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. आज महिला गटाच्या पहिल्या फेरीत आघीडीची महिला मल्ल अंकिता शिंदे तर पुरुष गटात मल्ल भैरू माने यांनी विजयी सलामी दिली.
हनुमान प्रतिमा पूजन व आखाडा पूजनाने स्पर्धेला सुरुवात झाली. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, बाबासाहेब देवकर, संभाजी वरुटे, मारुती जाधव, बाबा महाडिक, गणेश मानुगडे, अशोक माने, चंद्रकांत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे​, तालुका क्रीडा अधिकारी बालाजी बरबटे, सचिन चव्हाण उपस्थित होते. श्री. रेखावार म्हणाले​​, ‘‘देशातील सर्वात मोठी स्पर्धा या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस ​आहे.’’
पहिल्या फेरीत गंगावेस तालमीचा आघाडीचा मल्ल भैरू मानेने शाहूपूरी तालमीच्या महादेव झंजेचा पराभव केला. सुरूवातीपासूनच भैरूने प्रतिस्पर्धी मल्लावर वर्चस्व राखले. अंदाज घेत मोठ्या चपळाईने भैरूने एकेरी पट काढून महादेवला चितपट केले. कोल्हापूरची आघाडीची महिला मल्ल अंकिता शिंदे हिने पुण्याच्या अपेक्षा खांडेकरवर विजय मिळवत आगेकूच केली. मोतीबागचा मल्ल महेश वरुटेने सांगलीच्या अभिराज साळुंखेला आस्मान दाखाविले.
आजचे निकाल - महिला खुला गट (विजयी) - श्रावणी शेळके (हेरवाड), अंकिता शिंदे (शिंदेवाडी), कारुण्या सुनकू (क्रीडा प्रबोधिनी), ऋतुजा संकपाळ (क्रीडा प्रबोधिनी), वैष्णवी कुशाप्पा (पट्टणकोडोली), सायली बुशिंगे (गणेशवाडी), स्मिता पाटील (आमशी), मेघना सोनुले (मुरगूड), पौर्णिमा सातपुते (कोतोली), वैष्णवी कदम (मसूचीवाडी), अंकिता फातले (इचलकरंजी), सृष्टी भोसले (बिद्री), अंजली देशिंगे (इचलकरंजी), नंदिनी साळोखे (मुरगूड).
पुरुष गट - दिग्विजय जाधव (कऱ्हाड), अभिजित कणेरे (इंगळी), मनोज कन्नापडीवरकर (सोलापूर), शशिकांत भोंगार्डे (बानगे), भैरू माने (सोलापूर), सतीश खरात (सोलापूर), महेश वरुटे (मोतीबाग), अमोल माने (वडणगे), लिंगादेव होनमाने (शंकरगाव), तुषार ठोंबरे व अजय थोरात (दोघे शाहूपुरी), सिद्धेश कुंभार (कोल्हापूर), अरुण भोंगार्डे (बानगे), एकनाथ बेंद्रे (शाहू कुस्ती केंद्र).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63890 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top