जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

sakal_logo
By

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी
कोल्हापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (ता.६ ) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजिला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली. तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी तर विभागीय आयुक्तस्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येत असतो. जिल्ह्याधिकारी येथील लोकशाही दिनात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे तक्रार अर्ज करावेत असेही पत्रकात म्हटले आहे.


02941
कोरे अभियांत्रिकीतील दोघांची निवड
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हर्षल रामचंद्र कोळेकर (सिव्हील अंतिम वर्ष) आणि अक्षदा उत्तम बाड (कम्प्युटर विभाग अंतिम वर्ष) यांची राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झाली. कोळेकर याची युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई विद्यानगरी कलिना कॅम्पस मुंबई येथील शिबिरासाठी, अक्षदा उत्तम बाड एस. डी. एम. लॉ कॉलेज मंगळूर (कर्नाटक) येथे शिबिरासाठी निवड झाली. निवड प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, प्रोग्रॅम ऑफिसर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. निवडीसाठी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रा. बकस कुरणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

3629
नाधवडेतील गीता पाटील अध्यक्षपदी
कोनवडे ः नाधवडे (ता. भुदरगड) येथील पांडुरंग पाटील विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीमती गीता संभाजीराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती आनंदी मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डी. यु. पाटील होत्या. संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. अन्य सदस्य असे : शंकर पाटील, आप्पासो पाटील, विजयकुमार भोसले, आनंदा पाटील, महादेव देसाई, मारुती पाटील, शिवाजी पाटील, सौ. नीलम पाटील, रवींद्र वायदंडे, पांडुरंग गुरव आदींसह सचिव उदयसिंह देसाई, मोहन पाटील, एन. एस. पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.

0150५
01504
मुरुक्टेतील दत्तात्रय बुडके अध्यक्षपदी
पिंपळगाव ः मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील पांडुरंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बुडके यांची तर उपाध्यक्षपदी संगीता यादव यांची बिनविरोध निवड झाली. संचालक बाळकृष्ण अडसुळ, आनंदा पोवार, बाबासाहेब भोसले, एकनाथ शिंदे, नारायण पाटील, राजाराम नाझरे, लखन माने, गीता खोचारे, आनंदी पाटील, उपसरपंच दयानंद ऱ्हाटवळ, दयानंद बेलेकर, उपस्थित होते. सचिव अरुण बेलेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63901 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top