
Gag21_txt.txt
पंचायत समितीत आरोग्य शिबिर
गगनबावडा ः पंचायत समिती गगनबावडा व श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर कोल्हापूर व क्विक हील फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मोफत मोदामृत बाल कुपोषण तपासणी व उपचार शिबिर पंचायत समितीत झाले. उद्घाटन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात विश्वपंढरी कोल्हापूर येथे झाले होते.
तपासणी शिबिरात वयानुसार, उंचीनुसार व कमी वजनांच्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली व त्यानुसार बालकांना मोफत मोदामृत व वजनवाढीसाठी टॉनिक दिली. तालुक्यातून ९९ बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. अकरा जणांच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली. पथकाचे नेतृत्व डॉ. सागर कवारे यांनी केले. गटविकास अधिकारी माधुरी परीट यांचे मार्गदर्शन लाभले. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुमन जाधव व विभागाकडील अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पंचायत समितीकडील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63904 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..