गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

25937
अण्णासाहेब देसाई, बसवंत फडके

संगमेश्‍वरच्या अध्यक्षपदी देसाई
गडहिंग्लज : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील संगमेश्‍वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी बसवंत फडके यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक अमित गराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या. सचिव विलास खामकर यांनी स्वागत केले. अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव करवीर नावलगी यांनी सूचविले. त्याला बापूसाहेब जमादार यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी फडके यांचे नाव मलाप्पा भंगारी यांनी सूचविले. त्याला शिवाजी नाईक यांनी अनुमोदन दिले. या वेळी इराप्पा चौगुले, मौलासाहेब जमादार, नागेश देसाई, चंद्राप्पा कांबळे, साधना इंगवले, वैशाली सुतार उपस्थित होते. शंकर निंबाळकर यांनी आभार मानले.
---------------------
शिंदे शिक्षणशास्त्रमध्ये कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुलाखत तंत्र या विषयावर कार्यशाळा झाली. प्रा. तानाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. योगिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्चना कांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. प्रा. गायकवाड यांनी अभिरुप परिस्थितीमध्ये मुलाखतीला कसे सामोरे जायचे याचे प्रात्यक्षिक करुन घेतले. मुलाखत देताना कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या गोष्टी टाळायच्या, मुलाखतीसाठी तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. शिवाजी रायकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रियांका पवार यांनी आभार मानले.
---------------------
25938
सोमनाथ घेजी, बाबासाहेब पाटील

सोमलिंगच्या अध्यक्षपदी सोमनाथ घेजी
गडहिंग्लज : माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील सोमलिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ घेजी यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी आर. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत सदरच्या निवडी झाल्या. महाबळेश्‍‍वर चौगुले, शामराव घेजी, महेश चिनगोंडा, निगोंडा पाटील, कलगोंडा पाटील, बाळासाहेब चौगुले, मलगोंडा पाटील, सुजित पाटील, मल्लापा घेजी, आण्णासाहेब हेब्बाळे, रामू गवळी, बाळासाहेब गवळी, रमेश चौगुले, धऱ्याप्पा घेजी यांच्यासह संचालक गुरगोंडा पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश हमान्नावर, सोमनाथ गुरव, सुरखा हेब्बाळे, शिऊबाई पाटील, डॉ. बसवेश्‍वर चौगुले, अशोक गवळी, केंपान्ना कांबळे, सचिव बाळासाहेब चौगुले आदी उप०त होते. सोमगोंडा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63908 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top