गड-हरळी सेवा संस्था निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-हरळी सेवा संस्था निवड
गड-हरळी सेवा संस्था निवड

गड-हरळी सेवा संस्था निवड

sakal_logo
By

25960
शिरीष हरळीकर, किरण पाटील

हरळी सेवा संस्थेच्या
अध्यक्षपदी हरळीकर
गडहिंग्लज, ता. २ : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील हरळी बुद्रूक विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिरीष हरळीकर तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एफ. डी. जमादार होते. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ शेतकरी आघाडीचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले होते. अध्यक्षपदासाठी हरळीकर यांचे नाव हिंदुराव नौकुडकर यांनी सूचविले, तर दीपक कांबळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी किरण पाटील यांचे नाव पांडुरंग शिंदे यांनी सूचविले, तर महादेव पोवार यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा जगदीश हरळीकर यांच्या हस्ते सत्कार झाला. श्रीकृष्ण दूध संस्थेतर्फेही सत्कार झाला. संचालक प्रभाकर हरळीकर, धोंडीबा पताडे, बलवंत गुरव, शिवाजी पाटील, संभाजी डवरी, मालुताई पाटील, महादेवी गोरुले यांच्यासह अरुण हरळीकर, राजू गोरुले, प्रदीप पाटील, सुरेश साटपे, रणजीत गोंजारे, अजित पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63933 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top