जि. प. निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जि. प. निवडणूक
जि. प. निवडणूक

जि. प. निवडणूक

sakal_logo
By

गडहिंग्लजला सतरा गावे विस्कटली
गडहिंग्लज, ता. २ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यात पूर्वीप्रमाणेच ५ गट व १० गण कायम राहिले आहेत. हसूरचंपू, नूल, बसर्गे, हलकर्णी आणि नेसरी पंचायत समिती मतदारसंघातील गावांची अधिक अदलाबदल झाली आहे. एकूण दहा गणातंर्गत १७ गावे विस्कटली आहेत. दरम्यान, या प्रारुप प्रभाग रचनांवर ८ जून अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवायच्या आहेत. सरासरी लोकसंख्या गृहीत धरुन प्रभाग रचना केली आहे. बड्याचीवाडीचा बहुतांशी भाग नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने या गावची लोकसंख्या कमी झाली आहे. गतवेळचा बड्याचीवाडी गण आता हसूरचंपू तर बुगडीकट्टी गण हडलगे नावाने ओळखला जाणार आहे. प्रत्येक गटांची सरासरी लोकसंख्या ३४ ते ४२ हजार, तर गणांची सरासरी लोकसंख्या १७ ते २३ हजार इतकी आहे.

चौकट...
विद्यमानांना धक्का शक्य
- गणांतर्गत गावांमध्ये फेरबदल झाल्याने विद्यमानांना धक्का
- नूलमधून बड्याचीवाडी, वडरगे गाव गिजवणे गटात
- हलकर्णीमधून हिटणी, मुत्नाळ तर भडगावातील जरळी आता नूलमध्ये
- कळवीकट्टे गाव नेसरीमधून हलकर्णी गटात
- नूलमधील हणमंतवाडी भडगाव गटामध्ये गडहिंग्लजला सतरा गावे विस्कटली

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64056 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top