
भात, भुईमूग, उसाला पाऊस ठरला पोषक
01614
सडोली खालसा (ता.करवीर) ः जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस दमदार पडल्याने आता पेरण्यांना गती येणार आहे. येथील स्वच्छ तयार केलेल्या शिवारात सुरू असलेली पेरणीची लगबग.गुरुवारी दुपारी टीपलेले छायाचित्र.( राजू कुलकर्णी ःसकाळ छायाचित्रसेवा).
भात, भुईमुगासह
उसाला पाऊस पोषक
पेरणीला मिळणार गती : अपवाद वगळता समाधानकारक पाऊस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शहरात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असली तरी, परिसरातील गावांमध्ये झालेल्या पावसाने शेती, शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. खरीपाच्या पेरणीसह भरणी केलेल्या उसाला हा पाऊस पोषक ठरणार आहे. शहरापेक्षा तीव्रतेने झाला नसला तरीही ग्रामीण भागातील ओढ्या-नाल्यांना जोराचे पाणी वाहत राहिले. दरम्यान, आजच्या पावसामुळे उद्यापासून उर्वरित सर्व पेरण्यांसाठी शिवार फुलणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहिली जात होती. गेल्या महिन्यात झालेल्या दोन दिवसाच्या पावसानंतर अनेकांनी खरीपाची पेरणी केली होती. त्यानंतर बराच काळ पावसाने ओढ दिल्याने पावसाची प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, आजच्या पावसाने या पेरणीला उभारी मिळाली आहे. तसेच बियाणे उगवणीस हाच पाऊस पोषक ठरणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे उसाच्या सऱ्या पाण्याने भरून वाहिल्या. कळे तर्फ कळंबे, वाकरे, कुडित्रे, कोगे, सावरवाडीसह इतर गावांमध्ये ज्या भागात शेती सखल होती, त्या ठिकाणचे बांध तुटून गेले आहेत. आज झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.
आजच्या पावसाने खरीपाच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उद्यापासून भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर कडधान्य पेरणीसाठी शिवारात शेतकऱ्यांनी लगबग सुरु होणार आहे. यासाठी आजच त्याचे नियोजन करण्याचे काम सुरु राहिले.
....
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64224 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..