
रविवारपासून शिवराज्याभिषेक दिन
विशाळगडावर उद्यापासून
शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम
कोल्हापूर, ता. ३ ः येथील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. रविवारपासून (ता. ५) सलग दोन दिवस गडावर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रणजित घरपणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी दुपारी दोन वाजता पावनखिंडीचे पूजन, त्यानंतर मुंडा दरवाजा येथे ध्वजवंदन व गडपूजन होईल. त्यानंतर वृक्षारोपण व व्याख्यान आणि रात्री नऊला आतषबाजी होईल. सोमवारी (ता. ६) सकाळी आठ वाजता पालखी पूजन होईल. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह गड पायथा ते भगवंतेश्वर मंदिरापर्यंत पालखी होईल. त्यानंतर उत्सवमूर्तीची पूजा व नाण्यांचा अभिषेक होईल. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाबरोबरच महाप्रसादाचेही आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला श्रीमंत सरदार रायाजी बांदल देशमुख, संत तुकाराम महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज यांची प्रमुख उपस्थिती असेल. संस्थेचे कार्यप्रमुख योगेश केरकर, सोहळा समिती अध्यक्ष ऋषिकेश देसाई, उपाध्यक्ष विनायक करंबे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64251 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..