सेवा संस्थांतून विरोधक हद्दपार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा संस्थांतून विरोधक हद्दपार!
सेवा संस्थांतून विरोधक हद्दपार!

सेवा संस्थांतून विरोधक हद्दपार!

sakal_logo
By

सेवा संस्थांतून विरोधक हद्दपार!
---
निवडणुकांत ‘शत-प्रतिशत’ यश; बदललेले नियम ठरताहेत कारणीभूत?
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : स्थानिक स्वराज्य संस्था असो वा सहकारी संस्था. संस्थेच्या हितासाठी विरोधक महत्त्वाचे मानले जातात. विरोधक असणे लोकशाहीलाही अभिप्रेत आहे. पण, सेवा संस्थांच्या निवडणुका त्याला अपवाद ठरत आहेत. शत-प्रतिशत यशाने संस्थेतून विरोधकच हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. कदाचित सभासदांनी तसा कौल दिलाही असेल. पण, बिगर कर्जदारांसह निवडणूक चिन्हाबाबत बदललेला नियमही याला काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
गावाची आर्थिक नाडी म्हणून विकास सेवा संस्थांकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीनंतर या संस्थांच्या निवडणुकीत चुरस असते. अडीच-तीन वर्षांपासून विविध कारणांनी सेवा संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, दोन महिन्यांपासून या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गडहिंग्लज तालुक्यात १०६ सेवा संस्था आहेत. यातील ९७ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती. यातील ९१ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे. २६ संस्थांसाठी मतदान झाले; तर उर्वरित संस्था बिनविरोध झालेल्या आहेत.
विकास सेवा संस्थांच्या निकालावर नजर टाकल्यास तब्बल २१ संस्थांचा निकाल १३-० असा लागला आहे. म्हणजे एका पॅनेलला सर्व १३ जागा, तर दुसऱ्या पॅनेलच्या जागांची पाटी कोरीच राहिली. दोन संस्थांत नाममात्र एक जागा विरोधी पॅनेलला मिळाली आहे. याचा अर्थ या संस्थांतून विरोधकच हद्दपार झालेले आहेत. भलेही सभासदांनी हा कौल दिला असेल. पण, बिगर कर्जदार व निवडणूक चिन्हाबाबत बदललेला नियमही कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी बिगर कर्जदारांना कर्जदार गटातील उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. नव्या नियमाने त्यांनाही कर्जदार सभासदाप्रमाणे अधिकार मिळाला; तर पूर्वी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र निवडणूक चिन्ह मिळत होते. आता संपूर्ण पॅनेलला एकच चिन्ह दिले जात आहे. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान करणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.
---------

* सत्तांतरातही ‘१३-०’
गडहिंग्लज तालुक्यातील २६ विकास सेवा संस्थांसाठी मतदान झाले आहे. यातील केवळ चारच ठिकाणी सत्तांतर झाले. उर्वरित ठिकाणी सत्ताधाऱ्यांनीच वर्चस्व राखले आहे. सत्तांतर झालेल्या चारपैकी तीन ठिकाणी १३-० असा निकाल लागला. एकाच संस्थेत ७-६ असे काटावर बहुमत मिळाले आहे.
------------
* दृष्टिक्षेप गडहिंग्लजच्या सेवा संस्था निकालावर
- मतदान झालेल्या विकास सेवा संस्था.....२६
- १३-० असा निकाल लागलेल्या संस्था... २१
- अन्य निकाल लागलेल्या संस्था........... ०५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64304 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top