इचल : मानवी साखळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : मानवी साखळी
इचल : मानवी साखळी

इचल : मानवी साखळी

sakal_logo
By

२६४६६

‘सकाळ’च्या उपक्रमाला नागरिकांचे पाठबळ
इचलकरंजीत मानवी साखळी; महापूर रोखण्याच्या उपाययोजनांसाठी घोषणाबाजी
इचलकरंजी, ता. ३ ः संभाव्य महापूर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा एल्गार करत पंचगंगा नदीवरील नव्या पूलावर झालेल्या मानवी साखळीत पूरग्रस्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वच समाज घटकांनी उपस्थिती दर्शवून सकाळच्या उपक्रमाला पाठबळ दिले. पूरग्रस्तांच्या व्यथा मांडतांना महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची एकमुखी मागणी केली.
२०१९ व २०२१ मध्ये महापुराचा मोठा फटका इचलकरंजीला बसला. महापुराच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले होते. पाययोजना करण्याबाबत जोरदार घोषणा देत प्रशासनाकडे लक्ष वेधले.
‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने यांनी स्वागत केले. सहाय्यक व्यवस्थापक (जाहिरात) दत्ता टोणपे यांनी प्रास्ताविक केले. बातमीदार पंडित कोंडेकर यांनी आभार मानले. बातमीदार ऋषिषीकेश राऊत, संदीप जगताप, संतोष जेरे, संतोष शिंदे उपस्थित होते.

वाहतूक सुरळीत
सीमाभाग तसेच शिरोळ तालुक्यातून शहरात नवीन पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असते; पण वाहतुकीला अडथळा होऊ न देता हा उपक्रम झाला. शिवाजीनगर पोलिस ठाणे व शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छतेसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सहकार्य केले.

ग्रामीण भागातून सहभाग
पंचगंगा नदी काठावरील गावांतील नागरिकांनीही सहभाग घेतला. यात अब्दुललाट, रांगोळी, शिरदवाड, चंदूर, टाकवडे आदी ग्रामीण परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.

महिलांचा सहभाग लक्षवेधी
उपक्रमांत पूरग्रस्त बरगे मळा परिसरातून महिला सहभागी झाल्या होत्या. सैफनबी शेख, बेबी हटकर, शोभा झमके, महादेवी मनवाडे यांनी सहभाग घेतला.

यांचाही सहभाग
बाळासाहेब कलागते, प्रमोद बचाटे, पै. अमृत भोसले, रवींद्र लोहार, संजय जाधव, रवी रजपूते, आप्पा पाटील, राजू बोंद्रे, विजय रवंदे, प्रकाश पाटील, प्रकाश निकम, मलकारी लवटे, सदा मलाबादे, सनतकुमार दायमा, महावीर कोल्हापूरे, अनिल हेडा, उमाकांत दाभोळे, प्रशांत चाळके, स्वाभिमानी शेकतरी संघटनेचे अभिषेक पाटील, हेमंत वणकुंद्रे, सतिश मगदूम, महमंद मुजावर, विकास चौगुले, अर्जुन बागडे, संतोष पोवार, उत्तम चौगुले, आधार रेस्क्यू फोर्सचे संभाजी झुटाळ, सागर पाटील व त्यांचे सहकारी, फिनिक्स इन्फोटेकचे अर्जुन रंगरेज व त्यांचे विद्यार्थी, प्रविण रावळ, अनिता कुरणे, डी.के. हंकारे, पिरगोंडा पाटील, महावीर मगदूम, शशी नेजे, संदीप चव्हाण, किरण सुर्यवंशी, सागर कम्मे, दत्ता काळे, महेश बेडगे, बंडू मोरबाळे, समीर आरकाटे, अतुल काकडे, शुभम हणबर, राजू खामकर, अभिमन्यू कुरणे, अनिकेत रोकडे, आरिफ आत्तार, ओमकार पुजारी, राजू माळी, सरदार मुजावर, सुरज पोतदार, योगेश तापेकर, मारुती दाईंगडे, रेवननाथ कदम, पिंटू कोळी, गुरु निकम, बाळासो पाटील, सचिन माळी, गणेश जंगटे, युवराज जाधव, वृषभ हेरलगे आदी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64305 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top