
‘उपजिल्हा’चे अधीक्षक आंबोळे यांचा गौरव
26371
-----------------------------------------------------
‘उपजिल्हा’चे अधीक्षक आंबोळे यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांचा निवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला. आरोग्य उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्याहस्ते श्री. आंबोळे, पत्नी सौ. नंदा यांचा डॉ. राधिका साळुंखे व ललकारी घाटगे यांच्याहस्ते गौरव झाला.
डॉ. आंबोळे यांनी कडगाव प्राथमिक केंद्र, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, आजरा ग्रामीण रुग्णालय, कणकवली व पुणे येथे ३८ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे उपजिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाचे आनंदीबाई जोशी, कायाकल्प, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन पुरस्कार मिळाले. कोरोनातही शासन स्तरावर या हॉस्पिटलचा गौरव झाला. हॉस्पिटलसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक डॉ. माळी व डॉ. पांडे यांनी केले. डॉ. पी. पी. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. चंद्रकांत खोत, डॉ. शामसुंदर सागर यांच्याहस्ते पाहुण्यांचा सत्कार झाला. डॉ. माळी, डॉ. पांडे, डॉ. खोत, डॉ. चैताली आंबोळे, डॉ. बी. एम. देशमाने, डॉ. बी. बी. गॉडद, डॉ. भाग्यश्री कोगनोळे, डॉ. पद्मजा गावडे, डॉ. सुजित अनुरे, डॉ. नामदेव सावंत, आर. ए. मुल्ला, अनिल परीट, श्रृती भोला, श्रीमती घाटगे, प्रेरणा शिवणे, दामोदर मोहोळे, महेश पाटील, शिवाजी चौगुले यांची भाषणे झाली. डॉ. आंबोळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तहसीलदार दिनेश पारगे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते. डॉ. रमेश रेडेकर यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64338 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..