सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहास मिळणार प्रोत्‍साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहास मिळणार प्रोत्‍साहन
सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहास मिळणार प्रोत्‍साहन

सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहास मिळणार प्रोत्‍साहन

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद


सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाह प्रोत्‍साहन योजना
सर्वसाधारण सभेची मंजुरी; ५० हजार अनुदान देणार, अनेक नावीन्यपूर्ण योजना मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३ : विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय गावोगावी घेतला जात आहे. याला पूरक निर्णय आज झालेल्या जिल्‍हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतला. विधवा पुनर्विवाहास प्रोत्‍साहन देण्यासाठी आज सावित्रीबाई फुले यांच्या नावाने योजना जाहीर केली. यात विधवा पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, जमातीत हा विवाह झाला असेल तर समाजकल्याण व खुल्या वर्गात असा विवाह झाला तर महिला व बालकल्याण विभागाकडून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे विधवा पुनर्विवाहास चालना देण्याचा निर्णय होत असल्याचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी सांगितले.
जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक चव्‍हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. सभेत तब्‍बल ४० विषयांचा समावेश होता. यामध्ये नियमित विषयांसह अनेक नावीण्यपूर्ण योजनांना मंजुरी दिली. यात मोकळ्या जागांचा बीओटी तत्त्‍वावर विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. याकामी आर्किटेक्‍टची नेमणूक करण्यात येणार आहे. मेन राजाराम येथे सेमी इंग्रजी माध्यम चालू करणे, निवासी क्रीडा प्रशालेस प्रशिक्षक देणे तसेच या शाळेत प्रवेशासाठी निवड चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. समाजकल्याण विभागाकडून दलित वस्‍ती विकासासाठी निधी दिला जातो. यातूनच आता अंतर्गत रस्‍त्यावर विसावा पॉईंट केला जाणार आहे. कमवा शिका योजना सुरू करण्यासह दलित वस्‍तीस सोलर कुंपण करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस सर्व खातेप्रमुख उपस्‍थित होते.

शासकीय वाहनांचा विमा
आरोग्य विभागाच्या एका वाहनाचा चंदगड येथे अपघात झाला. अपघातग्रस्‍त वाहनाला विमा कवच नसल्याने जिल्‍हा परिषदेला जवळपास २ कोटीचा भुर्दंड बसला. त्यामुळे सर्वच वाहनांचा विमा उतरण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्‍ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. मुळात विम्याशिवाय वाहन चालवणे गुन्‍हा आहे. तरीही ही वाहने विम्याशिवाय फिरत आहेत. या वाहनातून चालक, डॉक्‍टर, कर्मचारी तसेच नागरिकही जातात. या सर्वांचाच जीव धोक्यात येत आहे. असे असतानाही विमा उतरण्याबाबत चालढकल करण्याचा प्रकार सुरू आहे.


दृष्टिक्षेपात...
सेंद्रिय शेती प्रोत्‍साहन योजना
समाजकल्याणकडून कमवा व शिका योजना
दलित वस्‍तीस सोलर कुंपन योजना
बॅडमिंटन कोर्टसाठी तरतूद
भाउसिंगजी रोड येथे गाळे उभारणी
चंदगड भवन दर निश्‍चिती(चंदगड वगळून)

उपाहारगृहावरून वाद
जिल्‍हा परिषदेने उपाहारगृह बचत गटास चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जी भाडे आकारणी होती त्यावरुनच वाद होता. आता बचत गटाच्या माध्यमातून एका ठेकेदारस उपाहारगृह चालवण्यास देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उत्‍पन्‍न वाढीच्या मूळ उद्देशाला बगल देण्याचाच हा प्रकार आहे. खुल्या स्‍पर्धेतून ठेकेदाराची निवड झाल्यास जिल्‍हा परिषदेला जादाचा निधी मिळतो. यामुळे स्‍वनिधीत वाढ होते. मात्र त्याला बगल देण्याचे नियोजन असून यावरुनच वाद होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64424 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top