इचल : युवक काँग्रेस निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : युवक काँग्रेस निवेदन
इचल : युवक काँग्रेस निवेदन

इचल : युवक काँग्रेस निवेदन

sakal_logo
By

काळ्या ओढ्याच्या
स्वच्छतेची मागणी
इचलकरंजी ः येथील महासत्ता चौक ते आमराई रोडवरील काळ्या ओढ्याची स्वच्छता करावी, या मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर युवक काँग्रेसतर्फे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले. ओढ्याची तातडीने स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. पावसाळ्याची सुरुवात होत असताना ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. नागरी वस्ती अधिक असल्याने साथीच्या रोगाची भीती वाढत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र अद्याप साफसफाई झालेली नाही. काळ्या ओढ्याची स्वच्छता करण्यास तातडीने सुरुवात करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. प्रमोद खुडे, हारून खलिफा, शेखर पाटील, संतोष माळी, प्रशांत लोले, विलास निर्मळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64479 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top