पोलिस शिपाई भरतीतच डमी उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस शिपाई भरतीतच डमी उमेदवार
पोलिस शिपाई भरतीतच डमी उमेदवार

पोलिस शिपाई भरतीतच डमी उमेदवार

sakal_logo
By

पोलिस भरतीत लेखी
परीक्षेत डमी उमेदवार
दोघा उमेदवारासह चौघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः पोलिस शिपाई भरतीच्या अनुषंगाने घेतलेल्या लेखी परीक्षेला डमी उमेदवार बसविल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चौघा संशयितांवर गुन्हा नोंद केला. परमेश्वर पंडित गवळी (आमसरी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) आणि रवींद्र रत्नाकर दांडगे (सुरगंळी, ता. भोकरदन, जालना) यांच्यासह अन्य दोघा तोतया उमेदवार अशी चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, जिल्ह्यात पोलिस दलातील शिपाई पदाच्या ७५ जागांसाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे ही प्रक्रिया २०२१ मध्ये राबविली. ७५ जागांसाठी सुमारे पाचशेहून अधिक उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले होते. त्यांची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेऊन नंतर शारीरिक चाचणी परीक्षा घेतली. दरम्यान, लेखी व शारीरिक चाचणी परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घेतलेल्या लेखी परीक्षेस संशयित उमेदवार गवळी आणि दांडगे यांच्या जागी तोतया उमेदवार बसल्याचे पुढे आले. याबाबत गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64584 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top