पोलिसांचा धोकादायक प्रवासाला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा धोकादायक प्रवासाला ब्रेक
पोलिसांचा धोकादायक प्रवासाला ब्रेक

पोलिसांचा धोकादायक प्रवासाला ब्रेक

sakal_logo
By

पोलिसांची ठाण्यातच राहण्याची व्यवस्था
कक्ष बांधणीचा प्रस्ताव ; रात्रीचा धोकादायक प्रवास थांबणार
राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी अनेक पोलिस रात्रीचा धोकादायक प्रवास करतात. हा प्रवास टाळण्यासाठी आता पोलिस ठाण्यातच निवास कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यासंबधीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस दलाकडून मंजुरीसाठी पाठविला आहे. प्रशासकीय पातळीवर पोलिसांच्या बदली प्रक्रियेत त्यांच्या पसंतीला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार त्यांना सोयीचे ठरले असे पोलिस ठाणे देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. दरम्यान, हुपरी, कुरुंदवाड, शहरापूर, कळे, गगनबावडा, राधानगरी, इस्फूर्ली, शाहूवाडी, हुपरी, हातकणंगले आदी पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिस हे शहराच्या ठिकाणी राहतात. ड्युटीला बाहेर पडताना हे पोलिस कर्मचारी सकाळी जेवणाचा डबासोबत घेऊनच जातात. यांचा सर्रास प्रवास हा मोटारसायकलवरूनच असतो. कर्तव्याची जबाबदारी पूर्ण करून ड्युटी संपल्यानंतर संबधित पोलिस पुन्हा घरी जातात. त्यासाठी त्यांना रात्रीचा धोकादायक प्रवास करावा लागतो. अनेक पोलिसांचा दररोजचा हा प्रवास २० ते ४० किलोमीटर अंतरा पर्यंतचा असतो. संबधित पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून ठाण्यातून बाहेर पडले की पुन्हा त्यांना काही कामासाठी परत बोलवणे शक्य होत नाही. जर का, आपत्तकालीन स्थिती निर्माण झाली तर मात्र घरी गेलेल्या पोलिसांना पुन्हा रात्रीचा धोकादायक प्रवास करत ठाण्याला जावे लागते. अशा प्रवासात अपघाताचे धोके निर्माण होतात. ठाण्यात निवासाची सुविधा नसल्याने यातील बहुतांशी पोलिसांना प्रवासाचा हा धोका पत्करावा लागतो. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या परिस्थितीचा विचार केला. त्यांनी शहरापासून दूर असणाऱ्या प्रत्येक ठाण्यात पोलिसांना राहण्याची व्यवस्था होईल, असा कक्ष बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

ड्युटी संपल्यानंतर पोलिसांना घरी जाण्यासाठी करावा लागणारा रात्रीचा धोकादायक प्रवास टाळता यावा, यासाठी पोलिस ठाण्यात निवास कक्ष बांधण्याचे नियोजन सुरू आहे.
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64620 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top