टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

२६५९४

आवाडे क्रीडा अकादमीतर्फे
गुरुवारी मुलींच्या कुस्त्यांचे मैदान
इचलकरंजी, ता.४ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त अहिल्यादेवी सेवाभावी संस्था व प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीतर्फे मुलींच्या कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजीत केले आहे. स्पर्धा गुरुवारी (ता.९) व्यंकोबा मैदान येथे होणार असून पश्चिम महाराष्ट्रात मुलींच्या कुस्तीचे मैदान प्रथमच होत आहेत. केवळ मुलींच्या कुस्त्या असल्याने शहर परिसरातील अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहून मुलींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक पै.अमृत भोसले, ललिता पुजारी, राजू पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, दोन वर्षाच्या कोरोना महामारीत सर्व खेळाडुंचे नुकसान झाले. कुस्ती खेळणार्‍या पैलवानांचे सराव बंद झाल्याने त्यांचेही फिटनेस बिघडला होता. तर स्पर्धाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन वर्षापासून इचलकरंजीत मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन रेंगळले होते. कोरोना संसर्ग कमी झाला असून सर्व निर्बंध हटविल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेमध्ये १५ ते २३ वयोगटातील मुलींचा समावेश असून पहिल्या क्रमांकासाठी स्नेहल पूजरी व संस्कृती पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्यासोबत दुसर्‍या क्रमांकासाठी सोनल खोत विरुद्ध अनुराधा आहेरकर, तर तिसर्‍या क्रमांकासाठी अनुष्का भोसले विरूद्ध प्रतीक्षा बेडगे यांच्यात लढत होणार आहे. यासोबत एकूण ३६ कुस्त्या होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवडे, शामराव फडके यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेस आमदार प्रकाश आवाडे, अशोक आरगे, विठ्ठल चोपडे, तानाजी हराळे, सागर चाळके आदींसह आजी-माजी पैलवानांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेस जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व बिरदेव को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांचे विशेष सहकार्य लाभाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64694 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top