आवश्यक- रामभाऊ थोरावडे जयंती कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- रामभाऊ थोरावडे जयंती कार्यक्रम
आवश्यक- रामभाऊ थोरावडे जयंती कार्यक्रम

आवश्यक- रामभाऊ थोरावडे जयंती कार्यक्रम

sakal_logo
By

26658
रामभाऊ थोरावडे
जयंतीनिमित्त सत्कार सोहळा
कोल्हापूर, ता. ४ ः रिक्षा संघटनेचे नेते (कै.) रामभाऊ थोरावडे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींचा सत्कार सोहळा झाला.
बिंदू चौकातील न्यू करवीर ऑटोरिक्षा युनियनच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, आरोग्य दूत बंटी सावंत, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कांबळे, किरण व्हनगुत्ते, राजू थोरावडे, राजेश गवळी आदींची उपस्थिती होती. दरम्यान, स्वाभिमानी वृत्तपत्र संघटना, राज्य वृत्तपत्र संघटना, करवीर ऑटोरिक्षा गृहनिर्माण संघटना, चर्मकार संघटना, कुंभार समाज पापाची तिकटी, शिवाजी रोड व्यापार मित्र मंडळ, रेणुका भक्त मंडळाने संयोजन केले.
रमेश गवळी, गजानन विभुते, दादा देशमुख यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. श्री. थोरावडे यांचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात मोठा संपर्क होता. त्या संपर्काचा उपयोग त्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी केला. रिक्षा व्यावसायिक हा त्यांचा आत्मा होता. त्याला जपण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी सुरेश ब्रम्हपुरे, सतीश दिवटे, मनोज थोरावडे, दीपक खांडेकर, बाबा साळोखे, राजू मांडवकर, विनायक माजगांवकर, सुभाष साळोखे, निवास ब्रह्मपुरे, चेतन अमित प्रभू ,रणजित चव्हाण, संजय जाधव, प्रकाश निगडे, अजय शहा, सनी साळोखे, संतोष सोनवणे, दीपक बावडेकर, बाबा साळोखे, सयाजी भोसले, राजू कुंभार, दीपक खांडेकर, अजित हंकारे, जयवंत बिडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64777 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top