
सकाळ चर्चासत्र
फोटो- आजच्या बातमीतून
चला, महापुरावर
सर्वांगीण चर्चा घडवूया!
‘सकाळ’तर्फे आज चर्चासत्र, पुरंदरे साधणार संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शहर आणि जिल्ह्यातील महापुराबाबत सर्वांगीण मंथन करण्यासाठी उद्या (रविवारी) सकाळ माध्यम समूहातर्फे चर्चासत्राचे आयोजन केले आहे. पाणीप्रश्नाचे अभ्यासक प्रदीप पुरंदरे त्यात संवाद साधणार असून, शिवाजी उद्यमनगरातील रामभाई सामाणी हॉलमध्ये सायंकाळी पाचला चर्चासत्र होईल. त्यातून महापुराच्या नेमक्या कारणांचा वेध घेत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.
श्री. पुरंदरे जलतज्ज्ञ आहेत. पाणीप्रश्नाची व्यापक मांडणी करणारे व या प्रश्नावर हस्तक्षेपवादी भूमिका घेणारे ते अभ्यासक असून, पाणीप्रश्नावर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असतात. कोल्हापूरच्या महापुराचा विचार करता त्याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यावर तात्पुरत्या व दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, अशा अनुषंगाने ते संवाद साधतील. सतरा वर्षांपूर्वी २००५ मध्ये जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. त्यानंतर २०१९ आणि गेल्या वर्षी पुन्हा महापुराचा विळखा जिल्ह्याला पडला आणि मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर आता ‘सकाळ’च्या पुढाकाराने महापुराचा सर्वांगीण अभ्यास सुरू झाला आहे. याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असून, त्याबाबची चर्चा या कार्यक्रमात होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64785 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..