रेड ॲण्ड ब्ल्यू लाईनचे पुढे काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेड ॲण्ड ब्ल्यू लाईनचे पुढे काय ?
रेड ॲण्ड ब्ल्यू लाईनचे पुढे काय ?

रेड ॲण्ड ब्ल्यू लाईनचे पुढे काय ?

sakal_logo
By

पूररेषेच्या अंमलबजावणीची धास्ती
प्राधिकरणातील गावांना पूररेषा नवीनच; बांधकाम व्यावसायिकांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ची
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः जलसंपदा विभागाने जाहीर केलेली आणि नकाशे प्रसिद्ध केलेल्या रेड ॲण्ड ब्ल्यू लाईनचे (लाल आणि निळी पूररेषा) मार्किंग केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांचे आणि बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष आहे. कोणाची किती जमीन ‘ब्ल्यू आणि रेड लाईन’मध्ये येते याची धास्ती लागून राहिली आहे.
कोल्हापूर महापालिका, शहर परिसरातील प्राधिकरणासह ग्रामीण भागातील हातकणंगले तालुक्यातील नदी पात्राशेजारी ही पूररेषा असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिका आणि प्राधिकरणातील गावांना याचा फटका बसणार आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामांचा विकास सुरू आहे. अनेकांनी त्यांचे बांधकाम प्रकल्प तेथे उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे त्यांना पूररेषेची धास्ती आहे.
विशेष करून प्राधिकरणातील गावांमध्ये बांधकामांचा विकास होत आहे. शहरात पूररेषा यापूर्वी निश्‍चित होती त्यामुळे तेथे बांधकाम करताना नियमांचे पालन करावे लागत होते. मात्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच पूररेषा निश्‍चित केली आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पूररेषा नवीनच आहे.
विशेष करून प्राधिकरणातील गावांत होणारा बांधकामांचा विकास यावर मर्यादा येणार आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी प्राधिकरणाच्या गावांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. तेथे त्यांचे बांधकामांचे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सुरू असतानाच या ‘रेड ॲण्ड ब्ल्यू लाईन’ पूररेषेने थांबा, पहा आणि जा अशी अवस्था शेतकरी, ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिकांची झाली आहे.

ग्रामीण भागाला फटका शक्य

शहर परिसरातील जाधववाडी परिसर, न्यू शाहूपुरी, दसरा चौकापर्यंतचा भाग, व्हीनस कॉर्नर परिसरात बांधकामांना मर्यादा आल्या आहेत. तेथे होणाऱ्या बहुमजली इमारतींना आता रेड लाईनच्या नियमांचा फटका बसणार आहे. त्यामुळे या परिसरातील जागांचे दर बाजारभावात कमी होण्याची शक्यता आहे. शाहूपुरीमध्ये जागांचा दर कमी होत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. आता हाच फटका शहर परिसरातील ग्रामीण भागांनाही बसणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64807 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top