अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात
अपघात

अपघात

sakal_logo
By

३७३३
इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्याचा
विजेचा धक्का बसून मृत्यू
इचलकरंजी : पालिकेतील बाग कर्मचाऱ्याचा घरासमोरील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाला. यशवंत शंकर कोकरे (वय ५३) असे त्यांचे नाव आहे. येथील टिळक रोडवरील जय भवानी तालीमजवळ ही घटना आज दुपारी घडली. यशवंत कोकरे पालिकेच्या शहीद भगतसिंग उद्यानात बागकाम करत होते. आज दुपारी ते कामावरून घरी परतले. कोकरे कुटुंबीयांनी पाणी आल्यावर उपसासाठी विद्युत मोटर लावली होती. यशवंत घरात प्रवेश करत असताना त्यांचा विद्युत मोटारीला स्पर्श झाल्याने शॉक लागून ते जागेवर कोसळले. नातेवाईक आणि शेजारच्या नागरिकांनी त्यांना आजयीएम रुग्णालयात हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

२७३२
बहिरेवाडीत एकावर खोऱ्याने हल्ला
उत्तूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील घरासमोरील खडी काढण्यावरून झालेल्या माराहाणीत दत्तात्रय शंकर डवरी गंभीर जखमी झाले. याबाबत रामचंद्र हरी जोंधळे, दीपक सदाशिव जोंधळे, पुंडलिक सदाशिव जोंधळे यांच्याविरोधात विद्या दत्तात्रय डवरी यांनी फिर्याद दिली. डवरी यांच्या घरासमोरील खडी रामचंद्र जोंधळे ट्रॕक्टरमधून भरून घेऊन जात होते. या वेळी वादावादी झाली. जोंधळे यांनी हातातील खोरे डवरी यांच्या डोक्यात मारले. भांडण सोडविण्यास डवरी यांची मुलगी पुढे आली असता तिचा हात पिरंगळून तिलाही जखमी केली. तपास सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.

इचलकरंजीत जुगाऱ्यांवर कारवाई
इचलकरंजी : अंदरबहार पत्त्‍याचा जुगार खेळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सहा जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुभम विजय तारळेकर, आकाश जनार्दन वायचळ, समीर जावेद शेख, आकाश शिवाजी आवळे, कृष्णा दीपक भोसले, निहाल भोपाल गागडे (सर्व इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रुपये जुगाराचे साहित्य असे एकूण ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई लालनगर येथील आरोग्य केंद्राच्या मागील उघड्यावरील जागेत केली. फिर्याद पोलिस अंमलदार रामा पाटील यांनी दिली.


शाहूवाडीजवळ अपघातात सात जखमी
कोल्हापूर ः केर्ले (ता. शाहूवाडी) येथे ट्रक आणि मोटारीचा आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये पुण्यातील सात जण जखमी झाले. नितीन मच्छिंद्र भुजबळ, तन्मय नितीन भुजबळ, आयुष्य सचिन भुजबळ, नवनाथ ज्ञानेश्वर ढोले, सोनाली जयेंद्र गायकवाड, जयेंद्र अविनाश गायकवाड, शीतल नितीन भुजबळ, राज नितीन भुजबळ (सर्व रा. येणेरे, जुन्नर, पुणे) अशी त्या जखमींची नावे आहेत. त्या सर्वांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. ते सर्वजण गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जात होते. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

लाईन बजार परिसरात चोरी
कोल्हापूर : लाईन बाजार परिसरातील एका घरातून चोरट्याने पर्समधील १५ हजाराची रोकड, मोबाईलसंचसह बँकेची कागदपत्रे चोरून नेली. हा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64843 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top