गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत यश मिळविले. इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. इलेमेंटरी परीक्षेत प्रतीक्षा खाडे, श्रावणी पाटील, मृणाल देसाई, स्वयंम कांबळे, वेलांकिनी मांगले, भक्ती जाधव, साक्षी शिंदे, सतेज गायकवाड, पृथ्वी दुंडगे, प्रज्ञा रेडेकर, गायत्री परीट, ओम चव्हाण, साहिल कुरळे, प्रतीक हजिरे हे १४ विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ४० विद्यार्थी ब श्रेणीत आणि ११ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत वेदांत साबळे हा विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाला. तर आठ विद्यार्थी ब श्रेणीत, २५ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शिक्षक बी. जी. कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-------------
26725
दयानंद तोडकर, शंकर पाटील

‘सिद्धेश्‍वर’च्या अध्यक्षपदी तोडकर
गडहिंग्लज : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील सिद्धेश्‍वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद तोडकर यांची, तर उपाध्यक्षपदी शंकर पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एफ. डी. जमादार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी पार पडल्या. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सदाशिव सावंत यांच्या पुढाकाराने नुकतीच बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदासाठी तोडकर यांचे नाव नारायण पाटील यांनी सूचविले. त्याला सातलिंग गुरव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शंकर पाटील यांचे नाव संजय तोडकर यांनी सूचविले. त्याला देवाप्पा राऊत यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा ज्येष्ठ सभासद पांडुरंग सावंत व काळू चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. सदाशिव सावंत यांनी स्वागत केले. संचालक शिवाजी मोरे, रावसाहेब जाधव, प्रकाश पाटील, शिवानंद कांबळे, सिंधुताई पाटील, भारती चौगुले, सचिव बाबासाहेब भोसले यांच्यासह सभासद उपस्थित होते.
---------------
‘घाळी’मध्ये भित्तीपत्रिकेचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे लैंगिक छळ प्रतिबंध आणि कायदा या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले. डॉ. सरला आरबोळे यांनी स्वागत केले. डॉ. पाटील, प्रा. अनिल उंदरे, अक्षता दंडगे यांची भाषणे झाली. लैंगिक छळ म्हणजे काय, भारतीय दंड संहिता, गुन्ह्यांचे स्वरुप, कायदा आणि शिक्षा आदी माहिती या भित्तीपत्रकातून मांडली आहे. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, डॉ. दत्तात्रय वाघमारे, डॉ. नागनाथ मासाळ, प्रा. विश्वनाथ पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. ओंकार खतकल्ले, अधीक्षक हरिभाऊ पन्हाळकर, पी. के. पोवार, के. ए. जरळी, ए. एस. सलपे, लक्ष्मी श्रेष्ठी आदी उपस्थित होते. वैशाली पाटील यांनी आभार मानले.
-------------------
घाळी महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात परीक्षेविषयी विद्यार्थ्यांची अभिवृत्ती : मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. डॉ. शिरीष शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. नागनाथ मासाळ यांनी स्वागत केले. प्रा. ओंकार खतकल्ले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. विश्‍वनाथ पाटील यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. डॉ. शितोळे म्हणाले, ‘‘लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तासांचे बजेटिंग करावे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची सवय लागल्याने त्यांच्यातील अभ्यासाच्या सवयी, एकाग्रतेचा ऱ्हास झाला आहे. त्यासाठी अभ्यासाचे बजेट महत्त्‍वाचे आहे.’’ डॉ. पाटील, प्रा. मिलिंद पाटील यांचीही भाषणे झाली. डॉ. सरला आरबोळे, डॉ. सरोज बिडकर, प्रा. महेश पाटील, प्रा. आशुतोष परीट, प्रा. ऋषिकेश गाडेकर, डॉ. जयश्री तेली, प्रा. पट्टणशेट्टी, प्रा. प्रीती देसाई, प्रा. आर. एस. सावेकर आदी उपस्थित होते. ऐश्वर्या शिंदे व सुप्रिया कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल उंदरे यांनी आभार मानले.
-----------------
शिंदे शिक्षणशास्त्रमध्ये गुणवंतांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला. एस. एस. पाच्छापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनल गिलबिले यांनी प्रास्ताविक केले. कांचन भादवणकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. जीवन पाटील, डॉ. सीमा साखरे, रजनी कांबळे, शुभांगी चौगुले, दीपिका कोरवी, रंजना गुसाळे, स्नेहा करडे, ज्योती कुंभार, स्वप्नाली नरेवाडी, संध्या मांगोरे, प्रियांका व्यवहारे, भारती सुतार या गुणवंतांचा सत्कार झाला. पाच्छापुरे, डॉ. साखरे, डॉ. पाटील, रंजना गुसाळे यांची भाषणे झाली. समीक्षा पालकर व कविता धायगोंडा यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य शिवाजी रायकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
------------------
26726
रोहिदास चौगुले, आनंदा देसाई

रोहिदास चौगुले अध्यक्षपदी
गडहिंग्लज : दुगुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हनुमान विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रोहिदास चौगुले यांची, तर उपाध्यक्षपदी आनंदा देसाई यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एफ. डी. जमादर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदासाठी चौगुले यांचे नाव सुहास देशपांडे यांनी सूचविले. त्याला विजय पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव कृष्णा कदम यांनी सूचविले. त्याला रवींद्र कांबळे यांनी अनुमोदन दिले. नावलौकिकाला साजेसा संस्थेचा कारभार करण्याची ग्वाही चौगुले व देसाई यांनी दिली. संचालक आप्पासाहेब पाटील, सुहास देशपांडे, जोतिबा आंबोळे, शशिकांत शिवूडकर, यलाप्पा नावलगी, हौशाक्का होडगे, लीलाबाई पाटील आदी उपस्थित होते. सचिव नीलेश देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64854 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top