
‘झेप’च्या अभ्यासिकेमुळेच यश ः सुजय कदम
L26733
गडहिंग्लज : झेप अॅकॅडमीतर्फे झालेल्या कार्यक्रमात सुजय कदम यांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले. शेजारी डॉ. आर. एस. निळपणकर, मीना रिंगणे, डी. के. मायदेव, संदीप कागवाडे, महेश मजती, आप्पासाहेब आरबोळे आदी.
‘झेप’च्या अभ्यासिकेमुळेच यश
सुजय कदम; सहायक निबंधकपदी निवडीबद्दल सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : कोरोना महामारीच्या काळात अभ्यासाची मोठी अडचण झाली होती. अशा काळातही झेप अॅकॅडमीने आपली सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून दिली. त्यामुळेच आपल्याला ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविता आले, असे प्रतिपादन सुजय कदम यांनी केले.
येथील झेप अॅकॅडमीतर्फे सत्कार कार्यक्रम झाला. याप्रसंगी कदम बोलत होते. कदम यांची नुकतीच सहकार विभागात सहायक निबंधकपदी निवड झाली आहे. त्याबद्दल झेपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौगुले म्हणाले, ‘‘गडहिंग्लज विभागातील अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत, यासाठी अॅकॅडमी सुरू केली आहे. सुजयच्या यशाने झेपच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.’’ डॉ. निळवणकर म्हणाले, ‘‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जिद्द व चिकाटीने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते.’’
मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केले. रवळनाथचे मुख्याधिकारी डी. के. मायदेव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, झेपचे विद्यार्थी उपस्थित होते. रेखा पोतदार व गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य मनोहर गुरबे यांनी आभार मानले.
चौकट...
हार मानू नका...
आजोबा, वडील व मामाकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगत कदम म्हणाले, ‘‘अभ्यासात सातत्य ठेवा. हार मानू नका. कोणत्याही पदाला कमी न लेखता प्रयत्न करा. नक्की यश मिळेल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64865 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..