
गडहिंग्लज पालिकेतर्फे पर्यावरण दिन गडहिंग्लज : पालिकेच्यावतीने आयोजित पर्यावरण दिनानिमित्त खेळाडूंनी रॅली काढून जनजागृती केली.
26796
गडहिंग्लज : पालिकेतर्फे आयोजित पर्यावरण दिनानिमित्त खेळाडूंनी रॅली काढून जनजागृती केली.
पालिकेतर्फे पर्यावरण दिन
रॅली, घोषवाक्य फलकातून केली गडहिंग्लजमध्ये जागृती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : येथील गडहिंग्लज नगरपरिषदेतर्फे पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रॅली, घोषवाक्य फलक, भित्तीपत्रकाद्वारे नागरिकांची जनजागृती केली.
निसर्ग आणि हिरवाईचे महत्व पटवून देण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, पर्यावरणाचे महत्व अधोरेखीत करणे हा मुख्य उद्देश पर्यावरण दिनामागचा आहे. जागतिक पर्यावरणदिनाचा यावर्षीची थीम ओन्ली वन अर्थ अशी आहे. या अंतर्गत, स्वच्छ आणि हरित जीवन शैलीसाठी आपल्या निवडींमध्ये बदल करून निसर्गाशी एकरूपतेने जगण्याची गरज अधोरेखित करणारा हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करणे अपेक्षित आहे. गडहिंग्लज पालिकेतर्फे आज विविध उपक्रम राबवून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करणेत आला. शहरात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपन करणेत आले. रॅली, माहितीदर्शक पत्रके, भित्तीपत्रके, घोषवाक्य फलकाद्वारे पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली.
जल, वायु, घातक घनकचरा, ध्वनी, प्लॅस्टिक कचरा तसेच ई-वेस्ट यांच्या प्रदुषण नियंत्रण बाबींचे व्यवस्थापन, सनियंत्रण व व्यवस्थापनाबाबतचा संदेश देण्यात आला. भूजल पुर्नभरण कार्यक्रम राबविणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा आवश्यक व मर्यादित स्वरूपात वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाने नागरिक, विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, तरुण मंडळे व खेळाडू, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64946 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..