
जरळी बंधारामार्गे नूल बसफेरी सुरू करा
जरळी बंधारामार्गे
नूल बसफेरी सुरू करा
नूल, ता. ५ : हिरण्यकेशी नदीवरील जरळी बंधाऱ्यातील बरगे काढण्यासाठी म्हणून बंद असलेली जरळीमार्गे नूल बसफेरी आता काम संपूनही अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ही फेरी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गेले आठवडाभर पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्यातील लाकडी व लोखंडी बरगे काढण्याचे काम केले. आता हे काम संपून चार दिवस उलटले तरी अद्याप बससेवा सुरू केलेली नाही. नूल भागातील नागरिकांना गडहिंग्लजला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. बंधाऱ्यातील बरगे काढताना वाहतुकीला अडथळा येणार म्हणून बससेवा बंद केली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून भडगावमार्गे बससेवा सुरू केली. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून जरळी, मुगळी आणि नूल येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. प्रवाशांचेही हाल झाले. जरळी प्रवाशांना दीड किलोमीटरचे आंतर पायपीट करून दुडगे येथे जाऊनच बस पकडावी लागते. चार दिवसांपूर्वी बंधाऱ्यातील बरगे काढण्याचे काम संपले आहे. आता कोणताही अडथळा बंधाऱ्यावर नाही. पाटबंधारे खात्याने तातडीने एसटी आगाराला पत्र देऊन बससेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65037 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..