पगारास विलंब, व्याजाचा भुर्दंड! प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पगारास विलंब, व्याजाचा भुर्दंड! प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न
पगारास विलंब, व्याजाचा भुर्दंड! प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न

पगारास विलंब, व्याजाचा भुर्दंड! प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न

sakal_logo
By

पगारास विलंब, व्याजाचा भुर्दंड!
प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न; दोन-दोन महिन्यांनी होताहेत पगार
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : महिन्याचा आपला पगार किती याचे गणित करूनच एखादी गरज भागविण्यासाठी कर्ज घेतले जाते. कर्जापोटी दरमहा ठराविक रक्कम पगारातून परस्पर कपात होऊन जाते. त्यामुळे फारशी चिंता राहत नाही; मात्र तोच पगार वेळेत झाला नाही तर कर्जावरील व्याजाचा भुर्दंड विनाकारण सोसावा लागतो. सध्या प्राथमिक शिक्षकांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांचा पगार दोन-दोन महिन्यांनी होत आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नियमित पगार व्हावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षकांतून होत आहे.
प्राथमिक शिक्षकांना पगार चांगला आहे; पण बहुतांश शिक्षकांनी जागा खरेदी, घरबांधणी, गाडी खरेदी, मुलांच्या शिक्षणासह विविध कारणांसाठी कर्ज उचलले आहे. शिक्षक पतसंस्था-बँका, राष्ट्रीयीकृत बँकेचे ते कर्जदार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांचा पगार होतो. या पगारातून कर्जाची रक्कम परस्पर कपात होऊन जाते. त्यामुळे कर्जाची फारशी चिंता राहत नाही;
पण गेल्या वर्षभरात प्राथमिक शिक्षकांच्या पगारात अनियमितता आली आहे. दोन-दोन महिन्यांनी पगार होत आहे. पगारास विलंब झाला तरी दैनंदिन खर्चाची अडचण येत नाही; पण पतसंस्था-बँकेकडून कर्जावरील व्याजाची आकारणी केली जाते. पगार जमा होण्यास विलंब झाला तर साहजिकच व्याजाची रक्कम वाढत जात आहे. दोन महिन्यांनी पगार झाल्यास किमान महिन्याचे जादा व्याज भरावे लागत आहे. कर्जाची रक्कमच मोठी असल्याने व्याजाची रक्कमही अधिक होत आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांचा पगार वेळेत होत असताना केवळ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्याच पगारात अनियमितता का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
---------------
चौकट
निधीच्या तरतुदीची अडचण
प्राथमिक शिक्षकांची संख्या अधिक आहे. शिवाय त्यांच्या पगाराच्या रकमाही अधिक आहेत. त्यामुळे पगारापोटी मोठ्या निधीची तरतूद करावी लागते. शासनाला निधीची तरतूद करताना अडचणी येत आहेत. वेळेत निधीच उपलब्ध होत नसल्याने पगारात अनियमितता येत असल्याचे सांगितले जात आहे.
-----------------
कोट...
शिक्षकांच्या पगारास होणारा विलंब हा प्रश्न वरिष्ठ स्तरावरील आहे. शासनाने यापुढे शिक्षकांचा पगार ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते काढण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. त्यामुळे पगारातील अनियमितता दूर होईल.
-नवलकुमार हलबागोळ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गडहिंग्लज.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65189 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top