‘एमपीएससी’तील शिवराजच्या यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमपीएससी’तील शिवराजच्या यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक
‘एमपीएससी’तील शिवराजच्या यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक

‘एमपीएससी’तील शिवराजच्या यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक

sakal_logo
By

26997
गडहिंग्लज : ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविलेल्या शिवराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शहरातून निघालेली मिरवणूक.

‘एमपीएससी’तील ‘शिवराज’च्या
यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात येथील शिवराज महाविद्यालयाच्या ऐश्‍वर्या नाईक (उपाधीक्षक, भूमी अभिलेख), श्रद्धा चव्हाण (उपशिक्षणाधिकारी), सुजय कदम (सहायक निबंधक) यांनी यश मिळविले. महाविद्यालयातर्फे या विद्यार्थ्यांची शहरातून मिरवणूक काढली.
दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील मुख्य मार्ग, कडगाव रोड, वडरगे रोडवरून मिरवणूक महाविद्यालयात आली. सवाद्य मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. महाविद्यालयात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते कै. एस. डी. पाटील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्‌घाटन झाले.
संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. ऐश्वर्या नाईक, सुजय कदम, श्रद्धा चव्हाण यांचा सत्कार झाला. श्री. वाघमोडे यांनी आपण अभ्यास किती करता यापेक्षा कसा करता, याला फार महत्त्व असल्याचे सांगितले. डॉ. कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचीही भाषणे झाली. ऐश्‍वर्या नाईक, सुजय कदम, श्रद्धा चव्हाण यांनी आपल्या यशात शिवराय महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
डॉ. सुधीर मुंज यांनी स्वागत केले. प्रा. बीना कुराडे, प्रा. शिवाजी भुकेले, युवराज बरगे, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, किरण कदम, संजय पाटील, प्रा. आझाद पटेल, प्राचार्य संतोष कुरबेट्टी, डॉ. राहुल मगदूम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65194 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top