शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु;
शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु;

शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु;

sakal_logo
By

फोटो


27166

शिवरायांच्या विचारांवरच शासनाची वाटचाल
---------
मुश्रीफ, पाटील; जिल्हा परिषदेतर्फे ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : ‘शिवराज्याभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करत असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत आहे. ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे,’ असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस येथे उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात ग्रामविकासमंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच राज्याभिषेक दिन. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांत ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिवविचार सामान्य जतनेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल,’ असा विश्‍‍वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून, ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरू असून, शिव विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येतील,’ असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी स्‍वागत केले.
....
डेमो हाउस उद्‌घाटन
कागलकर हाउस परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेतून डेमो हाउस उभारले आहे. याचे उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्‍ते व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्‍थितीत झाले. सुमारे पावणेतीन लाख खर्च करून चार दिवसांत हे उभे केले. जिल्‍ह्यात ३० हजारांवर प्रधानमंत्री आवासची उभारणी केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------

जिल्‍हा परिषदेत अवतरली शिवशाही
कोल्‍हापूर : पारंपरिक वेषभूषा, सनई चौघड्यांचे सूर, ‘हर हर महादेवचा जयघोष’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी आज जिल्हा परिषदेचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिवसोहळ्याचे. शाहीर डॉ. राजू राऊत व सहकाऱ्यांनी शिवभूपाळी सादर केली, तर ‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ हा आविष्कार सार्थक क्रिएशन्सच्या कलाकारांनी गीत व नाट्यातून सादर केला. सागर बगाडे आणि फिरंगोजी शिंदे मर्दानी ॲकॅडमीचे सादरीकरण होते. जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचच्या वतीने शिवगीते व पोवाड्यांचे सादरीकरण केले. प्रमोद पाटील आणि सहकाऱ्यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65290 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top